सातारा महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील आरोपी प्रशांत बनकरला अटक

आणखी एक आरोपी फरार

सातारा महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील आरोपी प्रशांत बनकरला अटक

महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यामधील एका सरकारी रुग्णालयातील महिला डॉक्टरने हॉटेलच्या खोलीत आत्महत्या केल्याचे प्रकरण समोर आले. तिने तिच्या तळहातावर एक चिठ्ठी लिहून ठेवली, ज्यामध्ये एका पोलिस अधिकाऱ्यावर गेल्या पाच महिन्यांत तिच्यावर बलात्कार आणि लैंगिक छळ केल्याचा आरोप आहे. तिच्या सुसाईड नोटमध्ये, पीडितेने लिहिले आहे की पोलिस अधिकारी गोपाळ बदाणे यांनी पाच महिन्यांत तिच्यावर अनेक वेळा बलात्कार केला. तसेच तिच्या नोटमध्ये प्रशांत बनकर या आणखी एका व्यक्तीचे नावही होते आणि त्याने तिला मानसिक त्रास दिल्याचा आरोप आहे. या प्रकरणात आता एका आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. प्रशांत बनकर या आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

घटनेनंतर पोलिसांची पथके दोन आरोपींच्या शोधासाठी रवाना झाली होती. युवतीने हातावर लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये प्रशांत बनकर याने मानसिक आणि शारीरिक छळ केल्याची माहिती लिहिली होती. सातारा ग्रामीण पोलिसांनी प्रशांत बनकरला अटक केली आहे. त्याला आज पहाटे ४ वाजता पुणे येथून अटक करण्यात आली. तो मित्राच्या फार्महाऊसमध्ये लपून बसला होता. या प्रकरणातील आणखी एक पोलीस असलेला आरोपी त्याला अटक करण्यात आलेली नाही, तो फरार आहे.

सातारा जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयातील महिला डॉक्टरने हॉटेलच्या खोलीत आत्महत्या केली. तिने तिच्या तळहातावर एक चिठ्ठी लिहून ठेवली होती, ज्यामध्ये एका पोलिस अधिकाऱ्यावर गेल्या पाच महिन्यांत तिच्यावर बलात्कार आणि लैंगिक छळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तिच्या सुसाईड नोटमध्ये, पीडितेने लिहिले आहे की पोलिस अधिकारी गोपाळ बदाणे यांनी पाच महिन्यांत तिच्यावर अनेक वेळा बलात्कार केला.

हे ही वाचा  : 

मुशर्रफ यांनी अमेरिकेकडून पाकिस्तानचे ‘अण्वस्त्रहरण’ केले होते!

आमच्या डोक्यावर बंदूक ठेवून व्यवहार करू नका!

पाकिस्तान-अफगाणिस्तान युद्ध; बाजारातून टोमॅटो गायब!

पॅगोंग तलावाच्या पूर्वेला चीन उभारतोय लष्करी संकुल

या घटनेची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सातारा पोलिस अधीक्षकांशी चर्चा केली आणि महिला डॉक्टरने तिच्या सुसाईड नोटमध्ये ज्या अधिकाऱ्यांची नावे दिली आहेत त्यांना तात्काळ निलंबित करण्याचे आदेश दिले. महाराष्ट्र राज्य महिला आयोगानेही या घटनेची दखल घेतली आहे आणि डॉक्टरांच्या तक्रारीवर कथित निष्क्रियतेची चौकशी करण्याचे निर्देश पोलिसांना दिले आहेत. आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर म्हणाल्या की, सातारा पोलिसांना आरोपींवर कठोर कारवाई करण्याचे कडक निर्देश देण्यात आले आहेत.

Exit mobile version