पुण्याच्या पैलवानाचा कुस्तीच्या तालमीत सरावा दरम्यान मृत्यू

लाल मातीत सोडला प्राण

पुण्याच्या पैलवानाचा कुस्तीच्या तालमीत सरावा दरम्यान मृत्यू

पुण्याच्या मोहोळ कुस्ती संकलनातील एका पैलवानाला व्यायाम करत असताना अचानक हृदयविकाराचा झटका आल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. पैलवान स्वप्नील पाडाळे असे या मृत पैलवानाचे नाव असून तो ३१ वर्षीय होता. व्यायाम करत असताना अचानकच स्वप्नीलला हृदय विकाराचा झटका आल्यावर त्वरित रुग्णालयात नेण्यांत आले तिथे त्याला मृत घोषित करण्यांत आले. आज सकाळी साडेसातच्या सुमारास हि घटना घडली. स्वप्निलच्या आकस्मिक मृत्यूमुळे कुस्ती खेळाच्या विश्वात शोककळा पसरली आहे.

स्वप्नील हा नेहमीप्रमाणे, सरावासाठी मारुंजी या ठिकाणी कुस्तीच्या तालमीत आला होता, कुस्तीसाठी सर्व करत असताना पैलवानांना सपाट्या मारायच्या असल्यामुळे तिकडे स्वप्नील सुद्धा व्यायाम करत होता. पण व्यायाम करत असताना  स्वप्नीलला तीव्र झटका आल्यामुळे तो खाली कोसळला. त्यावेळी तो अचानकच खाली कोसळल्यामुळे इतर लोकांनी त्याला तात्काळ दाखल केले मात्र त्याचा त्याआधीच मृत्यू झाला होता.

हे ही वाचा:

ऑस्ट्रेलियन पंतप्रधान ‘अँथनी अल्बानीज’ भारत भेटीवर

हात उगारण पडलं महागात आमदार बच्चू कडू यांना दोन वर्षांची कारावासाची शिक्षा

नौदलाच्या ध्रुव हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग, क्रू मेंबर्स सुरक्षित

वाढदिवस-महिला दिनानिमित्त वाड्यातील पाड्यांना जावयाची भेट

स्वप्नील याने पुण्यातील कात्रज परिसरातील मामासाहेब मोहोळ या कुस्ती संकुलातून कुस्तीचे प्रशिक्षण घेतले होते. कात्रज येथे नुकत्याच झालेल्या एन.आय.एस. कुस्ती कोच परीक्षेत राज्यामध्ये पहिला क्रमांक पटकावला होता. शिवाय तो महाराष्ट्र चॅम्पियन पण होता. सध्या तो विविध ठिकाणी पैलवानांना  कुस्तीचे प्रशिक्षण तर,  काही   मुलांना कुस्ती शिकवण्यासाठी जात होता असे कळले आहे. स्वप्नील हा एक युवा पैलवान म्हणून सगळीकडे परिचित होता. मूळचा मुळशी तालुक्यातला महाळुंगे इथला रहिवासी होता. अशी माहिती  आता  समोर आली आहे.

Exit mobile version