महिला डॉक्टर बलात्कार, आत्महत्या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक अटकेत

आरोपीना फाशी देण्याची मागणी

महिला डॉक्टर बलात्कार, आत्महत्या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक अटकेत

सातारा जिल्ह्यातील फलटण येथे एका महिला डॉक्टरवर बलात्कार आणि तिने केलेल्या आत्महत्या प्रकरणात पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदाणे यांना शनिवारी संध्याकाळी अटक करण्यात आली. काही तासांपूर्वीच या प्रकरणातील सहआरोपीला देखील पोलिसांनी ताब्यात घेतले होते.

दिवसभरात, फलटण पोलिसांनी पुण्यातून प्रशांत बनकर या सॉफ्टवेअर अभियंत्याला अटक केली. तो डॉक्टरच्या आत्महत्येच्या नोटमध्ये नमूद असलेल्या दोन व्यक्तींतील एक आहे.

साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी सांगितले की, उपनिरीक्षक बदाणे नंतर स्वतः फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात हजर झाला.

हे ही वाचा:

डायजेस्टिव संतुलन राखण्यासाठी हायड्रोजन आवश्यक

रेटिनल स्कॅनद्वारे हृदयविकाराचा धोका कळणार

अपस्केलिंग भारत इन्व्हेस्टर समिटमध्ये २५० कोटींच्या संधी निर्माण झाल्या

शास्त्रीयपासून पॉपपर्यंत संगीताचे जादूगर हृदयनाथ मंगेशकर

बनकरवर डॉक्टरचा मानसिक छळ केल्याचा आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप आहे. त्याला सातारा जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले, जिथे न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

घटनेचा तपशील

सदर महिला डॉक्टर मराठवाड्यातील बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील रहिवासी असून सातारा जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयात कार्यरत होती. गुरुवारी रात्री ती फलटण शहरातील एका हॉटेलमध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली.

तिच्या हातावर लिहिलेल्या आत्महत्येच्या नोटमध्ये तिने नमूद केले की, उपनिरीक्षक गोपाळ बदाणे यांनी तिच्यावर वारंवार बलात्कार केला. तर प्रशांत बनकर, जो सॉफ्टवेअर अभियंता आहे, त्याने तिचा मानसिक छळ केला.

या दोघांविरोधात बलात्कार आणि आत्महत्येस प्रवृत्त करणे या कलमांखाली गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, बनकर हा त्या घराच्या मालकाचा मुलगा आहे जिथे डॉक्टर राहत होती. आत्महत्येपूर्वी ती त्याच्याशी फोनवर बोलत आणि चॅट करत होती, असे तपासात आढळले आहे.

उपनिरीक्षक बदाणे यांना या प्रकरणात नाव आल्यावर सेवेवरून निलंबित करण्यात आले. डॉक्टरचे अंत्यसंस्कार शुक्रवारी रात्री बीडच्या वडवणी येथे करण्यात आले.

कुटुंबाचा संताप

पीडितेच्या नातेवाईकांनी आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे. त्यांनी आरोप केला की, तिने अनेकदा छळाविषयी तक्रारी केल्या, पण तिच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करण्यात आले.

दुसऱ्या एका नातेवाइकाने सांगितले, फलटणमधील काही राजकीय लोक तिला शवविच्छेदनाच्या रिपोर्टमध्ये बदल करण्यास सांगत असत, कारण ती वारंवार पोस्टमॉर्टेम ड्युटीवर असे. तिने उपनिरीक्षकाबद्दल बद्दल अनेकदा तक्रार केली होती, पण कोणीच काही केले नाही.”

राजकीय वाद

दरम्यान, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) नेते अंबादास दानवे यांनी माजी भाजप खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर डॉक्टरवर दबाव आणल्याचा आरोप केला.

दानवे म्हणाले की, निंबाळकर यांच्या दोन सहाय्यकांनी एकदा डॉक्टरशी संपर्क साधून तिला एका अटक आरोपीला ‘फिट’ किंवा ‘अनफिट’ घोषित करण्यासाठी दबाव आणला होता.”

हे आरोप निंबाळकर यांनी पूर्णपणे फेटाळले. ते म्हणाले, या आरोपात कोणतेही सत्य नाही. माझे नाव मुद्दाम ओढले जात आहे.

दरम्यान, भाजप आमदार सुरेश धस यांनी मागणी केली की, डॉक्टरवर दबाव आणणाऱ्या खासदारालाही आरोपी करण्यात यावे. मात्र त्यांनी कोणतेही नाव घेतले नाही.

डॉक्टरच्या पूर्वीच्या तक्रारी

याच वर्षाच्या सुरुवातीला, डॉक्टरने साताऱ्यातील अधिकाऱ्यांना दिलेल्या उत्तरात नमूद केले होते की,
तिला पोलीस अधिकाऱ्यांकडून धमक्या व टोमणे मिळत आहेत, विशेषतः तिच्या बीड जिल्ह्यातील गुन्ह्यांबद्दल. मृत डॉक्टरच्या दोन चुलत बहिणी वैद्यकीय व्यवसायात असून त्यांनी आरोप केला की, रुग्णालय प्रशासनाने तिला मुद्दाम पोस्टमॉर्टेमची ड्युटी देत तिचा छळ केला.

कुटुंबाची पार्श्वभूमी

तिच्या आईच्या म्हणण्यानुसार, मृत डॉक्टर एमड कोर्स करू इच्छित होती आणि त्यासाठी तयारी करत होती. एमबीबीएससाठी घेतलेले ३ लाख रुपयांचे कर्ज अद्याप फेडायचे होते. तिचे वडील शेतकरी आहेत आणि शिक्षित नाहीत. मी शिक्षक आहे, मीच तिला बीडला शिक्षणासाठी नेले होते. ती केवळ एमबीबीएसवर थांबू इच्छित नव्हती, तर एमडी (मेडिसिन, ईएनटी किंवा नॉन-क्लिनिकल) शाखेत पुढे जायचे स्वप्न पाहत होती,” असे तिच्या काकांनी सांगितले.

Exit mobile version