जम्मू-काश्मीरमधील जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर सुरक्षा यंत्रणांनी हाय अलर्ट जारी केला असून, रामबन जिल्ह्यातील तपासणी नाक्यावर घडलेल्या एका घटनेमुळे सुरक्षा व्यवस्थेत आणखी सतर्कता वाढवण्यात आली आहे. तपासणीसाठी उभारण्यात आलेल्या नाक्यावर एक स्कॉर्पिओ वाहन थांबवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, चालकाने वाहन न थांबवता वेगाने पुढे नेण्याचा प्रयत्न केल्याने पोलिसांनी गोळीबार केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामबन जिल्ह्यातील तपासणी नाक्यावर नियमित वाहन तपासणी सुरू असताना स्कॉर्पिओ वाहनाला थांबण्याचा इशारा देण्यात आला होता. मात्र, चालकाने पोलिसांच्या सूचनेकडे दुर्लक्ष करत वाहन पुढे दामटले. त्यामुळे वाहन रोखण्यासाठी पोलिसांनी गोळीबार केला. या कारवाईनंतरही गाडी चालकाने पुढे नेली.
#WATCH | Ramban, J&K | Security agencies seized a Scorpio car on the Dalwas Link Road, with a J&K registration number, after it allegedly evaded a police checkpoint at Chanderkote and fled towards the Nashri area. Further details awaited. pic.twitter.com/FfZBTVNnjB
— ANI (@ANI) August 7, 2026
अखेर पोलिस पाठलाग करत असल्याने चालकाने दलवासजवळ रस्त्याच्या कडेला गाडी सोडून दिली आणि अंधाराचा फायदा घेत जंगलाच्या दिशेने पळून गेला. घटनास्थळी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट दिली. रामबनचे पोलीस अधीक्षक अरुण गुप्ता यांनी सांगितले की, “संशयित स्कॉर्पिओ जप्त करण्यात आली असून या प्रकरणाचा गांभीर्याने तपास सुरू आहे.”
हे ही वाचा:
चाकरमान्यांनो, तयारीला लागा! कोकणासाठी सोडणार ५,२२० विशेष बस
‘धुरंधर’ ठरला नेटफ्लिक्सवर २०२६ मधील नंबर वन चित्रपट
सौदी अरेबिया-पाकिस्तान-तुर्कीची नवी संरक्षण आघाडी ‘इस्लामिक नाटो’?
भारतीय हवाई दलाला मिळाल्या पहिल्या महिला ‘टॉप गन’
या घटनेनंतर रामबन जिल्हा पोलीस, केंद्रीय राखीव पोलीस बल आणि भारतीय लष्कराने संयुक्तपणे संपूर्ण परिसरात शोधमोहीम सुरू केली आहे. चंद्रकोट ते नाशरी आणि दलवास परिसरातील जंगले आणि महामार्गाला लागून असलेल्या भागात तपासणी केली जात आहे. संशयित चालकाचा शोध घेण्यासाठी ड्रोन आणि श्वानपथकाची मदत घेतली जात आहे. तसेच महामार्गावरील प्रत्येक वाहनाची कडक तपासणी सुरू आहे.
