राज्यातील सहा खासदारांना ‘वाय प्लस’ दर्जाची सुरक्षा पुरवण्याचे आदेश गुप्तचर विभागाने दिले आहेत. संभाव्य धोक्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला असून, पोलीस यंत्रणेला तातडीने या आदेशाची अंमलबजावणी करण्यास सांगण्यात आले आहे.
सुरक्षा वाढवण्यात आलेले खासदार:
संजय देशमुख (यवतमाळ)
संजय जाधव (परभणी)
संजय दिना पाटील (उत्तर पूर्व मुंबई)
नागेश पाटील आष्टीकर (हिंगोली)
ओमराजे निंबाळकर (धाराशिव)
भाऊसाहेब वाघचौरे (शिर्डी)
हे ही वाचा:
झारखंड राज्यसभा निवडणुकीत NDA ला मोठा विजय
जालन्याच्या शाळेत पाकिस्तानी गाण्यावर नृत्य, गुस्ताख नबी की एक सजा
राम मंदिर देणगी प्रकरणात मोठा खुलासा
वेगवान गोलंदाज ते फिरकीचा बादशाह
गुप्तचर आयुक्त शिरीष जैन यांनी जारी केलेल्या या आदेशात म्हटले आहे की, संबंधित खासदारांच्या सुरक्षेबाबतचा आढावा वेळोवेळी घेण्यात यावा. जिल्हास्तरीय समितीने या सुरक्षेबाबत पुढील निर्णय घ्यावा, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच, संबंधित खासदारांच्या दौऱ्यांदरम्यान स्थानिक परिस्थिती आणि संभाव्य धोके लक्षात घेऊन आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आदेश स्थानिक पोलीस घटकांना देण्यात आले आहेत.
या निर्णयामुळे संबंधित खासदारांच्या सुरक्षेबाबत गृह विभाग सतर्क झाला असून, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे.
या सहा खासदारांनी उबाठा शिवसेना सोडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे त्यांना धोका असल्याचे म्हटले जात आहे.
