एक कोटींचे बक्षीस असलेल्या माओवादी नेत्यासह दोघांचा खात्मा

झारखंडमध्ये मोठी कारवाई

एक कोटींचे बक्षीस असलेल्या माओवादी नेत्यासह दोघांचा खात्मा

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मार्च २०२६ पर्यंत नक्षलवाद्यांचा खात्मा करण्याची घोषणा केल्यानंतर सुरक्षा दलांकडून नक्षल विरोधी मोहीम अधिक आक्रमक करण्यात आली आहे. अशातच सुरक्षा दलाला झारखंडमध्ये मोठे यश मिळाले आहे. तब्बल एक कोटी रुपयांचे बक्षीस असलेल्या एका वरिष्ठ माओवादी नेत्यासह दोन वरिष्ठ बंडखोरांना ठार करण्यात यश मिळाले आहे.

झारखंडमधील हजारीबाग जिल्ह्यात सोमवारी सकाळी सुरक्षा दल आणि माओवादी यांच्यात चकमक झाली. या चकमकीत एक कोटी रुपयांचे बक्षीस असलेल्या एका वरिष्ठ माओवादी नेत्त्याचा खात्मा करण्यात यश आले. याशिवाय दोन वरिष्ठ बंडखोरांनाही ठार मारण्यात आले, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. मारल्या गेलेल्या कमांडरची ओळख पटली आहे. वरिष्ठ नेता हा भारतीय कम्युनिस्ट पक्ष (माओवादी) चा केंद्रीय समिती सदस्य होता. तसेच तो पूर्व भारतातील मोस्ट वॉन्टेड माओवादी नेत्यांपैकी एक होता.

झारखंड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विशिष्ट गुप्तचर माहितीच्या आधारे कोब्रा बटालियन, गिरिडीह पोलिस आणि हजारीबाग पोलिसांनी संयुक्तपणे ही कारवाई केली. गिरिडीह-बोकारो सीमेजवळील तातीझारिया पोलिस ठाणे हद्दीतील करंदी गावात सकाळी ६ वाजताच्या सुमारास ही चकमक सुरू झाली. या चकमकीत आणखी दोन माओवादी नेते- २५ लाख रुपयांचे बक्षीस असलेला बिहार- झारखंड स्पेशल एरिया कमिटी सदस्य रघुनाथ हेम्ब्रम उर्फ चंचल आणि १० लाख रुपयांचे बक्षीस असलेला झोनल कमिटी सदस्य बिरसेन गंजू उर्फ रामखेलावान हे देखील मारले गेले. चकमकीनंतर सुरक्षा दलांना तीन दहशतवाद्यांचे मृतदेह सापडले. अधिकाऱ्यांनी सांगितले की, जंगली भागात अजूनही शोध मोहीम सुरू आहे.

हे ही वाचा:

परतीच्या पावसाची दमदार हजेरी; मुंबईत रेल्वे, रस्ते वाहतुकीवर परिणाम

लहान-सहान गोष्टी विसरायला लागला आहात?

आता देशात एक डेमोग्राफी मिशन

राज्यपाल आचार्य देवव्रत महाराष्ट्राची अतिरिक्त जबाबदारी स्वीकारणार

दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच कुख्यात महिला नक्षलवादी सुजाता हिने आत्मसमर्पण केले आहे. सुजाता हिच्या डोक्यावर एक कोटींचे बक्षीस होते. सुजाता ही अनेक वर्षांपासून दक्षिण बस्तरमध्ये सक्रिय होती आणि नक्षलवाद्यांची दक्षिण उपक्षेत्र ब्युरो इन्चार्ज होती. नक्षलवादी सुजाता हिने तेलंगणा पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले.

Exit mobile version