29 C
Mumbai
Monday, April 27, 2026
घरविशेषसनातनी गौतम खट्टर यांना गोवा सरकारकडून अटक; वकील विष्णू जैन संतापले

सनातनी गौतम खट्टर यांना गोवा सरकारकडून अटक; वकील विष्णू जैन संतापले

सेंट झेवीयर यांच्याबद्दल केले होते वक्तव्य

Google News Follow

Related

सनातनी विचारांचा प्रसार प्रचार करणारे गौतम खट्टर यांना गोवा सरकारने अटक केल्याच्या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. गोव्यामध्ये सध्या मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील भाजपाचे सरकार आहे. सनातन महासंघ या संघटनेचा संस्थापक असलेल्या खट्टर यांनी सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्याबद्दल केलेल्या कथित आक्षेपार्ह उल्लेखांमुळे त्यांना अटक करण्यात आली आहे. गोवा पोलिस त्याचा शोध घेत असताना हिमाचल प्रदेश पोलिसांनी शुक्रवारी त्याला अटक केली.

यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे वकील विष्णू शंकर जैन यांनी या अटकेबद्दल टीका केली आहे. व्हीडिओच्या माध्यमातून त्यांनी या अटकेसंदर्भातील कायदेशीर बाबी स्पष्ट केल्या.

विष्णू शंकर जैन म्हणतात की, माधव खट्टर हे कायद्याचा अभ्यास करत आहेत. गौतम खट्टर यांना अटक करण्यासाठी गोवा पोलीस डेहराडूनला पोहोचले. पण गौतम खट्टर तिथे न सापडल्यानंतर कलम ३५ (३) चा भंग केल्याबद्दल कोणतीही नोटीस न देता गोवा पोलिसांनी माधव खट्टर याला अटक केली. ट्रान्झिट रिमांड न घेता त्याला गोव्याला नेण्यात आले. त्यानंतर त्याला चार दिवसांच्या पोलिस कोठडीत ठेवण्यात आले. त्यानंतर गौतम खट्टर यांना कुल्लू येथून अटक करण्यात आली.

हे ही वाचा:

मुंबई–पुणे ‘मिसिंग लिंक’ पूर्ण; एकनाथ शिंदे यांनी केली पाहणी

“आपली बस, आपली सेवा” : एसटीची नवी मोहीम १ मेपासून

तृणमूलचे ‘कट्टर’ समर्थक म्हटल्यावर मतदार पत्रकारावर भडकले!

दिल्ली विमानतळावर टेकऑफपूर्वीच स्विस एअरच्या विमानाला आग

गोवा पोलिसांनी गौतम खट्टर यांना अटक करताना जे कारण दिले त्यात म्हटले आहे की, ख्रिश्चन समाज रस्त्यावर उतरला असता, ख्रिश्चन समाजाचा दबाव होता त्यामुळे आम्हाला गौतम खट्टर यांना अटक करावी लागली. खट्टर यांनी जे वक्तव्य केले ते ख्रिश्चन समाजाच्या भावना दुखावणारे होते, असाही पोलिसांचा दावा होता, असे विष्णू जैन म्हणाले.

विष्णू शंकर जैन यांनी सवाल विचारला आहे की, संविधानातील १९ कलमानुसार आम्हा सनातनींना स्वतःचे मत व्यक्त करण्याचा अधिकार नाही? उद्या अशी परिस्थिती येईल की, औरंगजेब, खिलजी, बाबर, मुघल यासारख्या हिंदुंची हत्याकांडे करणाऱ्यांविरोधात  बोलल्यासही हिंदू समाजावर एफआयआर दाखल होईल. म्हणून सगळ्या हिंदू समाजाने एकत्र येऊन गौतम खट्टर यांच्यासाठी एकजूट करावी.

खट्टर हे ‘सनातन महासंघ’ या संघटनेचे संस्थापक असून त्यांना कुल्लू जिल्ह्यात अटक करण्यात आली, असे गुन्हे शाखेचे पोलिस अधीक्षक राहुल गुप्ता यांनी पणजी येथे सांगितले. गुन्हे शाखेची टीम लवकरच खट्टर यांचा ताबा घेऊन त्यांना गोव्यात आणणार आहे. गोवा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार हिमाचल प्रदेश पोलिसांनी ही कारवाई केली.

यापूर्वी गोव्यातील न्यायालयाने त्याच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते. संत फ्रान्सिस झेवियर, जे गोव्याचे संरक्षक संत मानले जातात, यांच्याविरोधातील त्याच्या भाषणामुळे वाद निर्माण झाला होता.

पणजी येथे ‘धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी’ त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि तेव्हापासून पोलीस त्यांचा शोध घेत होते. या प्रकरणात त्याचा भाऊ माधव यालाही उत्तराखंडमधून अटक करण्यात आली होती. खट्टर यांचा सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्याबद्दल कथित “आक्षेपार्ह” वक्तव्य करणारा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संतापाची लाट उसळली होती. सेंट फ्रान्सिस यांचे अवशेष बेसिलिका ऑफ बॉम जिजस येथे जतन करून ठेवलेले आहेत.

सनातन संस्थेची टीका

दरम्यान, सनातन संस्थेने १८ वर्षीय माधव खट्टर (गौतम खट्टरचा भाऊ) याला अटक केल्याबद्दल तीव्र टीका केली असून ही कारवाई “अन्यायकारक” असल्याचे म्हटले आहे. सेंट फ्रान्सिस झेवीयर  यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याच्या प्रकरणात ही अटक करण्यात आली होती.

संस्थेचे सदस्य अभय वर्तक यांनी दिलेल्या निवेदनात असा आरोप केला की, पोलिसांनी गौतम खट्टरला नोटीस देण्याऐवजी पहिल्या वर्षाचा विद्यार्थी असलेल्या त्याच्या भावालाच अटक केली. त्यांचा दावा आहे की, माधवने गौतमसाठी भाषण लिहिले होते, असे पोलिसांनी म्हटले आहे.

सनातन संस्थेने हा दावा फेटाळून लावत म्हटले की, प्रसिद्ध युट्युबर गौतम खट्टर यांना भाषण लिहिण्यासाठी दुसऱ्या व्यक्तीची गरज भासणार नाही. तसेच, ही कारवाई लोकांना दिशाभूल करण्यासाठी करण्यात आल्याचा आरोप करून, अटकेविरोधात आंदोलन छेडण्याची घोषणा केली आहे.

संस्थेने उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर धामी यांना हस्तक्षेप करण्याचे आवाहन करत, विद्यार्थ्याच्या भवितव्यावर परिणाम होऊ नये यासाठी योग्य कायदेशीर प्रक्रिया पाळण्याची मागणी केली आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
304,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा