आईमुळे बलात्कारी पुत्राला २० वर्षे सक्तमजुरी!

आईनेच उघड केली पीडितेच्या कुटुंबीयांसमोर ओळख

आईमुळे बलात्कारी पुत्राला २० वर्षे सक्तमजुरी!

उत्तर प्रदेशातील अमरोहा येथील विशेष पोक्सो न्यायालयाने एका २४ वर्षीय तरुणाला २० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली आहे. या तरुणाने मे २०१९मध्ये आठ वर्षांच्या मुलीवर बलात्कार केला होता.हे घृणास्पद कृत्य करणाऱ्याचे नाव मूलचंद असे आहे. मूलचंद याच्या आईला त्याच्या या घृणास्पद कृत्याचा पश्चाताप वाटत होता. त्यामुळे या घटनेनंतर ही आई स्वतःच पीडित मुलीच्या कुटुंबाकडे गेली होती आणि आपल्या मुलाला माफ करा, असे आर्जव करून तिने तिच्या मुलाचे नाव उघड केले होते.

‘आठ वर्षांची मुलगी घराबाहेर खेळत असताना आरोपीने तिला बाइकवरून नेले. तसेच, त्याने पुरावे नष्ट करण्याचाही प्रयत्न केला. या मुलीने नंतर त्याचे वर्णनही केले. मात्र हा तरुण शेजारील गावातील असल्याने ही मुलगी त्याची ओळख स्पष्टपणे सांगू शकली नाही,’ अशी माहिती अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील रतनलाल लोधी यांनी शनिवारी दिली. या प्रकरणी तेव्हाच गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर जिल्हा रुग्णालयात या मुलीची वैद्यकीय चाचणी झाली आणि मुलीवर बलात्कार झाल्याचे त्यात सिद्ध जाले. त्यानंतर आयपीसी कलम आणि पोक्सो कायद्यानुसार अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

हे ही वाचा.. 

बोरीवली पूर्वला श्री महालक्ष्मी पूजा उत्साहात

मॅनहोल साफ करताना कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास कुटुंबाला ३० लाखांची भरपाई द्या!

विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचे तात्पुरते वेळापत्रक जाहीर

मसूद अझहरचा निकटवर्तीय दहशतवादी दाऊद मलिकला ठोकले!

मात्र या आरोपीच्या मातेला आपल्या मुलाच्या घृणास्पद कृत्याचा पश्चाताप होत होता. त्यामुळे त्याची आई या मुलीच्या घरी पोहोचली आणि तिने त्याचे नाव उघड केले. त्यामुळे या मुलाला अटक करणे सोपे झाले. पोलिसांनी त्यानंतर आरोपीला अटक करून त्याला तुरुंगात पाठवले. १९ ऑक्टोबर २०१९ रोजी या प्रकरणी आरोपपत्र दाखल झाले. तर, अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे विशेष न्यायाधीश संजय कुमार यांनी आरोपीला २० वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा आणि ६० हजार रुपयांचा दंड ठोठावला.

Exit mobile version