32 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
घरक्राईमनामामसूद अझहरचा निकटवर्तीय दहशतवादी दाऊद मलिकला ठोकले!

मसूद अझहरचा निकटवर्तीय दहशतवादी दाऊद मलिकला ठोकले!

भारताचा मोस्ट वॉन्टेड अतिरेकी

Google News Follow

Related

भारतविरोधी दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असणारा पाकिस्तानी दहशतवादी दाऊद मलिक याची अज्ञात मारेकऱ्याने गोळी मारून हत्या केली आहे. मालिक हा लश्कर-ए-जब्बारचा संस्थापक असून भारताचा मोस्ट वाँटेड दहशतवादी मौलाना मसूद अझहर याचा निकवर्तीय आहे. त्याची पाकिस्तानमधील उत्तर वजिरिस्तान भागात हत्या करण्यात आली. शुक्रवारी उत्तर वजिरिस्तान भागातील कबायली जिल्ह्यातील मिराली परिसरात काही अज्ञात बुरखेधारी हल्लेखोरांनी केलेल्या या हल्ल्यात तो मारला गेला. हत्या केल्यानंतर हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पलायन केले, अशी माहिती पोलिसांनी दिली.

गेल्या काही दिवसांपासून भारताने मोस्ट वाँटेड म्हणून घोषित केलेल्या अनेक दहशतवाद्यांची अज्ञात बंदुकधाऱ्यांनी पाकिस्तानमध्ये हत्या केली आहे. ११ ऑक्टोबर रोजी भारताचा सर्वांत मोस्ट वाँटेड दहशतवाद्यांपैकी एक असलेल्या आणि पठाणकोट हल्ल्याचा प्रमुख सूत्रधार शाहिद लतीफ याची सियालकोट येथे अज्ञात हल्लेखोरांनी हत्या केली होती. भारत सरकारने त्याचे नाव दहशतवाद्यांच्या यादीत जाहीर केले होते. एनआयएनेही यूएपीए अंतर्गत त्याच्यावर गुन्हे दाखल केले आहेत.

हे ही वाचा.. 

बोरीवली पूर्वला श्री महालक्ष्मी पूजा उत्साहात

मॅनहोल साफ करताना कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास कुटुंबाला ३० लाखांची भरपाई द्या!

विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचे तात्पुरते वेळापत्रक जाहीर

कंत्राटी भरतीने नोकऱ्या जाणार असल्याचा गैरसमज पसरवला!

सन २०१६मध्ये जैशच्या दहशतवाद्यांनी पठाणकोटच्या हवाई तळावर हल्ला केला होता. यात सात जवान हुतात्मा झाले होते. पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, सियालकोटच्या बाहेरील भागात एका मशिदीमध्ये दहशतवादी शाहिदची हत्या करण्यात आली होती.

हल्लेखोर मोटारसायकलवरून आले होते आणि गोळी झाडून पळाले होते. शाहिद लतिफने पठाणकोटच्या दहशतवाद्यांना शस्त्रे आणि अन्य मदत पुरवली होती. लतीफला अमली पदार्थांच्या तस्करीप्रकरणीही अटक करण्यात आली होती. तो जैशचा दहशतवादी होता. मौलाना मसूद अझहरच्या आदेशानुसार, त्याने पठाणकोटला हल्ला करण्याचा कट आखला होता. सन २०१०मध्ये त्याची सुटका झाल्यानंतर त्याला पाकिस्तानकडे सुपूर्द करण्यात आले होते. त्या दरम्यान त्याच्यासह २० दहशतवाद्यांना वाघा सीमेवरून पाकिस्तानला सोपवण्यात आले होते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
153,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा