24 C
Mumbai
Thursday, February 22, 2024
घरराजकारणविधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचे तात्पुरते वेळापत्रक जाहीर

विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचे तात्पुरते वेळापत्रक जाहीर

हिवाळी अधिवेशन १० दिवसांचे असण्याची शक्यता

Google News Follow

Related

महाराष्ट्र विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचे तात्पुरते वेळापत्रक जाहीर झाले आहे. यंदाचे हिवाळी अधिवेशन ७ डिसेंबर ते २० डिसेंबरला नागपुरात पार पडणार आहे. यंदाचे हिवाळी अधिवेशन अवघ्या १० दिवसांचे असण्याची शक्यता आहे.

हिवाळी अधिवेशनाच्या ७ डिसेंबर ते २० डिसेंबर दरम्यान दहा दिवसाच्या कामकाजाची तात्पुरती दिनदर्शिका जाहीर झाली आहे. म्हणजे ७ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनाचे कामकाज २० डिसेंबरपर्यंतच नमूद करण्यात आले आहे. यंदाच्या हिवाळी अधिवेशनात अनेक मुद्दे गाजण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. नाशिक- पुण्यातील ड्रग्ज प्रकरण, ललित पाटील याची अटक,  राज्यातील दुष्काळी स्थिती, कायदा-सुव्यवस्था, पाण्याचा प्रश्न, नागपूरमध्ये अतिवृष्टीने झालेलं नुकसान याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे.

नागपूर शहर आणि जिल्ह्यात पावसामुळे नागरिकांचे मोठे नुकसान झाले होते. पायाभूत सोयी सुविधांचे नुकसान झालेल्या नागपूर शहर आणि जिल्ह्याला हिवाळी अधिवेशनाच्या काळात विशेष पॅकेज मिळेल, असं मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी सांगितलं होतं. त्यामुळे त्याकडे लक्ष असणार आहे.

हेही वाचा.. 

ऐतिहासिक चित्रपटांच्या निर्मितीला विशेष अनुदान

‘हमास’ची क्रूरता उघड; हॅरी पॉटरच्या छोट्या चाहतीचा मृतदेह आढळला!

अखिलेश यादव-कमलनाथ यांच्यातील वाद चिघळला!

महाराष्ट्राच्या सुवर्ण विजेत्याला आता एक कोटी!

गेल्यावर्षी डिसेंबरच्या दुसऱ्या-तिसऱ्या आठवड्यात नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन भरलं होतं. त्या अधिवेशनात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली होती. विधानसभा अध्यक्षांसाठी वापरलेल्या निर्लज्ज शब्दावरुन ही कारवाई करण्यात आली होती. तर, हिवाळी अधिवेशन काळापर्यंत विधीमंडळात जयंत पाटलांना प्रवेशबंदी घालण्यात आली होती.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
130,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा