फसवणूक आणि बनावट कागदपत्रांच्या प्रकरणात सीबीआयकडून (CBI) वॉन्टेड असलेला मुनव्वर खान याला इंटरपोल चॅनेलच्या माध्यमातून भारतात परत आणण्यात आले आहे. ही कारवाई इंटरपोल चॅनेलच्या माध्यमातून करण्यात आली असून, सीबीआयच्या इंटरनॅशनल पोलिस कोऑपरेशन युनिट (IPCU) ने परराष्ट्र मंत्रालय (MEA) आणि कुवैतमधील नोडल कॉन्टॅक्ट ब्युरो (NCB-Kuwait) यांच्या सहकार्याने हे मिशन यशस्वी केले.
मुनव्वर खानवर काय आरोप?
मुनव्वर खानवर बनावट कागदपत्रांची निर्मिती व त्याद्वारे आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात सीबीआयने त्याच्याविरुद्ध रेड कॉर्नर नोटीस जारी केली होती. तो देशाबाहेर फरार असल्यामुळे इंटरपोलच्या सहाय्याने त्याचा शोध घेण्यात येत होता.
कशी झाली अटक?
११ सप्टेंबर २०२५ रोजी मुनव्वर खानला कुवैत पोलिसांच्या विशेष पथकाने भारतात आणले. तो राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ, हैदराबाद येथे पोहोचल्यावर त्याचा ताबा सीबीआयच्या स्पेशल टास्क ब्रँच (STB), चेन्नईच्या पथकाने घेतला. दरम्यान, मुनव्वर खानविरुद्ध सुरू असलेल्या प्रकरणांची चौकशी आता वेग घेणार आहे.
हे ही वाचा :
नेपाळ: तुरुंगातून पळण्याचा प्रयत्न करणाऱ्या कैद्यांवर लष्कराचा गोळीबार, २ ठार!
दहशतवादी मॉड्यूलशी संबंधित तिघांना अटक; पाकिस्तानी संबंध उघड
वाघ पकडण्यात अपयश; संतप्त ग्रामस्थांनी वन अधिकाऱ्यांना पिंजऱ्यात बंद केलं!
“भारताला दहशतवाद पुरस्कृत देशाकडून धडा घेण्याची गरज नाही”
त्याच्याकडून आणखी माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला जाणार असून, त्याला लवकरच न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. सीबीआयकडून देण्यात आलेल्या अधिकृत माहितीनुसार, ही कारवाई हे भारताच्या आंतरराष्ट्रीय पोलिस सहकार्याचे उदाहरण असून, देशात फरार आरोपींविरुद्ध सुरू असलेल्या मोहिमेतील एक महत्त्वाचे यश मानले जात आहे.
