मालाड पूर्व येथे ५२ वर्षीय महिलेने १४व्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली आहे. आत्महत्येचे कारण कळू शकलेले नसून दिंडोशी पोलिसांनी अपमृत्युची नोंद केली आहे.
बळीत महिला गृहणी असून ती मालाड पूर्व मकरानी पाडा, येथे तीन मुलांसह राहण्यास होती. तिच्या पतीचे काही वर्षांपूर्वी निधन झाले होते. सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास तिने तिच्या राहत्या इमारतीच्या १४ व्या मजल्याच्या बाल्कनीतून उडी टाकून आत्महत्या केली.
हे ही वाचा:
केंद्र खत अनुदानावर ३७,९५२ कोटी करणार खर्च
खोकला, सर्दीवर या वनस्पतीचा रामबाण उपाय !
उत्तर प्रदेशातील २.८९ कोटी मतदारांची नावे वगळली
मुंबईत रविवारी तिन्ही मार्गावर मेगा ब्लॉक
जमिनीवर जखमी अवस्थेत आढळल्यानंतर तिला जोगेश्वरी येथील ट्रॉमा केअर रुग्णालयात हलवण्यात आले. डॉक्टरांनी तिला दाखल करताच मृत घोषित केले. पोलिसांना सुसाईड नोट मिळून आलेली नसून आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही,पोलिस तिच्या मुलांची आणि नातेवाईकांची चौकशी करणार असल्याचे कळते.
