जामनगरमधील बेकायदेशीर दर्ग्यात स्वीमिंग पूल, महागडे बाथटब, अत्याधुनिक सोयीसुविधा

११ हजार चौरस फुटांवर बांधला होता दर्गा

जामनगरमधील बेकायदेशीर दर्ग्यात स्वीमिंग पूल, महागडे बाथटब, अत्याधुनिक सोयीसुविधा

गुजरातमधील जामनगरमध्ये प्रशासनाला मोठा धक्का बसला, जेव्हा एका बेकायदेशीर दर्ग्याच्या नावाखाली बनवलेल्या जागेवर स्विमिंग पूल, महागड्या बाथटबसह मोठ्या मार्बल टाईल्सच्या खोल्या आढळून आल्या. या संकुलाने नागमती (किंवा रंगमती) नदीच्या प्रवाहाला अडथळा निर्माण केला होता, ज्यामुळे पावसाळ्यात मोठे पूर येत होते. त्यामुळे स्थानिक प्रशासनाने या बेकायदेशीर बांधकामावर मोठ्या प्रमाणावर बुलडोझर चालवले. पण त्यात असलेल्या आलिशान सोयीसुविधा पाहून सगळ्यांचेच डोळे पांढरे झाले.

११ हजार स्क्वे.फूटमध्ये उभं धार्मिक स्थळ की महाल?

जामनगर पोलिसांच्या माहितीनुसार, हा तथाकथित दर्गा सुमारे ११ हजार चौरस फुटांमध्ये पसरलेलं होतं. त्यात एक फार्म हाऊस, स्विमिंग पूल, बाथटबसह शाही खोल्या आणि अनेक आलिशान सुविधा होत्या.

एका बंद दारावर स्पष्टपणे लिहिलं होतं की “बाहेरच्या लोकांना या खोलीत प्रवेश नाही”, ज्यामुळे त्या जागेच्या वापराबाबत संशय बळावला. आणखी एक पाटी इथे दिसते त्यात म्हटले आहे की, “येथे कोणतीही रक्कम स्वीकारली जात नाही”, त्यामुळे प्रशासनाला या महागड्या प्रकल्पासाठी पैसा कुठून आला? याचा शोध लागत नाहीये.

हे ही वाचा:

महिलांच्या आणि कुटुंबांतील मालमत्ता हक्कांचं चित्र कसं बदललं

बेंगळुरू चेंगराचेंगरी : हायकोर्टाने दिले महत्वपूर्ण निर्देश !

काँग्रेसने ७५ वर्षांत फक्त बडबडच केली

कोझिकोड सेक्स रॅकेट प्रकरण : केरळचे दोन पोलीस अटकेत

“या धार्मिक स्थळामुळे नदीचा प्रवाह अडवला गेला होता, त्यामुळे पावसाळ्यात पूरस्थिती उद्भवत होती. या बेकायदेशीर जागांवर कारवाई करत ११ हजार स्क्वे.फूटची संरचना जमीनदोस्त करण्यात आली. तिथे फार्महाऊस, स्विमिंग पूल, बाथटब आणि मोठ्या खोल्या सापडल्या.”

या दर्ग्याला जमीनदोस्त करण्यासाठी १२ जेसीबी, ३ हिताची मशिन्स, १३ ट्रॅक्टर्स, १०० कामगार आणि मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या संपूर्ण जमिनीची किंमत सुमारे २०० कोटी रुपये इतकी आहे. या धार्मिक स्थळासह संबंधित लोक गेल्या २०-२५ वर्षांपासून तिथे वास्तव्यास होते. काही जागा वास्तविक राहण्यासाठी वापरल्या जात होत्या, तर काहींमध्ये अज्ञात हेतूंसाठी राजेशाही स्वरूपात रचना करण्यात आली होती. सध्या पोलिसांकडून मालक व इतर संबंधित लोकांचा शोध सुरू आहे.

इतर बेकायदेशीर बांधकामेही पाडली

या मोहीमेदरम्यान २९४ बेकायदेशीर घरे, ४ इतर धार्मिक स्थळे देखील तोडण्यात आली, विशेषतः बच्चूनगर विस्तार भागातील बांधकामांवर लक्ष केंद्रित करण्यात आलं. यामुळे नदीचा नैसर्गिक प्रवाह पुन्हा सुरळीत होईल आणि पुढील पूरस्थिती टाळता येईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Exit mobile version