पहलगाम हल्ल्यानंतर दुःखी झालेली नेहा खान बनली नेहा शर्मा

गाझियाबादमधील घटना

पहलगाम हल्ल्यानंतर दुःखी झालेली नेहा खान बनली नेहा शर्मा

जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे हिंदू पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर दुःख झाल्यामुळे एका मुस्लिम महिलेने इस्लाम सोडून सनातन धर्म स्वीकारला आहे. हिंदू रक्षा दलाच्या मदतीने तिने औपचारिक धार्मिक विधींद्वारे सनातन धर्म स्वीकारला. तिने तिचे नाव नेहा खान वरून नेहा शर्मा असे बदलले आहे.

गाझियाबादमधील नेहा शर्मा यांनी सांगितले की, दहशतवाद्यांनी हिंदू पर्यटकांना त्यांचा धर्म विचारून ठार केले. या कृत्यामुळे तिने इस्लामचा संबंध दहशतवादाशी जोडला आणि तिने इस्लाम सोडून सनातन धर्म स्वीकारण्याचा निर्णय घेतला. हिंदू धर्मात प्रवेश करताना नेहा शर्मा यांच्या मनगटावर हिंदू रक्षा दलाच्या राष्ट्रीय अध्यक्षा पिंकी चौधरी यांनी पवित्र धागा बांधला. पिंकी चौधरी यांनी नेहा यांना संरक्षणाचे आश्वासन दिले आणि या कृतीकडे धर्मांतर म्हणून न पाहता ‘घरवापसी’ म्हणून पाहिले पाहिजे यावर भर दिला. तिने असेही म्हटले की, सनातन धर्म स्वीकारण्याची स्वेच्छेने निवड करणाऱ्या प्रत्येकाचे संघटना स्वागत करते.

हे ही वाचा : 

जगाला माहिती आहे पाकिस्तान काय आहे

देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या चिन्मय दास यांना जामीन मंजूर!

मी इथे मतदान केले, माझ्याकडे रेशन कार्ड आहे, आता पाकिस्तानला जाऊन काय करू?

माजी रॉ प्रमुख आलोक जोशी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाचे प्रमुख

पिंकी चौधरी यांनी खुलासा केला की, मूळ दिल्लीची राहणारी नेहा खान हिचा पूर्वी घटस्फोट झाला होता. तिच्या वडिलांनी तिच्या पूर्वाश्रमीच्या पतीशी पुन्हा लग्न करण्यासाठी तिच्यावर दबाव आणला होता, जो तिने नाकारला. त्यानंतर काही दिवसांतच पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला, ज्यामुळे ती खूप दुःखी झाली आणि तिला सनातन धर्म स्वीकारण्यास प्रेरित केले. हिंदू रक्षा दलाच्या साहिबाबाद कार्यालयात नेहा यांच्या धर्म स्वीकारल्याबद्दल हवन समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे.

Exit mobile version