पहलगाम मध्ये जात नाही धर्म विचारून हिंदूंची हत्या केली. हिंदूंनो जात सांगू नका धर्म सांगा. हिंदू एकता आंदोलनाच्या झेंड्याखाली एकत्र या. हिंदू एकता आंदोलन बागणी शाखेचे व कार्यालयाचे उद्घाटन हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी झालेल्या जाहीर सभेत बोलताना हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे म्हणाले की, पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात इस्लामिक दहशतवाद्यांनी हिंदूंना मारत असताना जात विचारून नव्हे धर्म विचारून त्यांची गोळ्या घालून हत्या केली. हिंदूंनो यापुढे जात सांगू नका यापुढे आपला हिंदू धर्म सांगा. देशात व राज्यात हिंदुत्ववादी सरकार असताना सुद्धा देशात बॉम्बस्फोट होत आहेत. हिंदूंच्या धर्म विचारून हत्या होत आहेत. आता हिंदूंनी हिंदू एकता आंदोलनाच्या बॅनर खाली एकत्र येऊन देशातल्या कट्टर पंथीय मुस्लिमांना जशास तसे उत्तर दिले पाहिजे तरच हिंदूंच्या वरील हल्ले थांबणार आहेत. यासाठी गावागावात हिंदू एकता आंदोलनाच्या शाखा स्थापन करून. हिंदू एकता आंदोलनाचे धर्म रक्षक बना.
हे ही वाचा:
१० वर्षांच्या डेटिंगनंतर शिलादित्यने श्रेया घोषालला कसं केलं होतं प्रपोज?
राहुल-अदानींनी हात मिळवला, फोटो नाही काढला!
७० फूटांचा ‘मेस्सी महाकाय’ कोलकात्यात उभा!
यावेळी हिंदू एकता आंदोलनाचे ज्येष्ठ नेते दत्तात्रय भोकरे, जिल्हा उपाध्यक्ष पै. प्रदीप निकम, मनोज साळुंखे, अजिंक्य पाटील, जिल्हाध्यक्ष संजय जाधव यांची भाषणे झाली. या सभेत हिंदू एकता आंदोलन बागणी शहराध्यक्ष म्हणून सुरज आडिसरे, उपाध्यक्ष म्हणून बाळासाहेब चव्हाण, खजिनदार म्हणून उमेश परीट यांना निवडीची पत्रे जिल्हाध्यक्ष संजय जाधव यांच्या हस्ते देण्यात आली.
यावेळी सूत्रसंचालन शिवाजी पाटील यांनी केले. या कार्यक्रमाला संजय चव्हाण, भूषण बासर, आनंदराव सावंत, दिलीप कोळी, सोमनाथ गोटखिंडे, अनिरुद्ध कुंभार, अवधूत जाधव, गजानन माने, अनिकेत अंबरुळे, अनिकेत कुंभार, आदी पदाधिकारी उपस्थित होते.
