सांगली राजवाडा चौकात सुरू असलेल्या हिंदू एकता आंदोलन संघटना सांगली शिवोत्सवाची सांगता समारोप रक्षक गुरुकुल कुपवाड मर्दानी खेळाच्या प्रात्यक्षिकाने सांगता करण्यात आली. या मर्दानी खेळाचा शुभारंभ रा. स्व. संघाचे जिल्हा कार्यवाह नितीनजी देशमाने, व भाजपाचे नेते पृथ्वीराज बाबा पाटील, उद्योगपती प्रदीपजी बोथरा, तानाजीराव शिंदे, बाळासाहेब मोहिते, हिंदू एकता चे ज्येष्ठ नेते दत्तात्रेय भोकरे यांच्या हस्ते शस्त्रपूजन करून करण्यात आले.
रक्षक गुरुकुलच्या मावळ्यांनी तलवारबाजी, दांडपट्टा, भाला चालवणे, कुऱ्हाड चालवणे, लाठी काठी, लिंबू कापणे, डोक्यावर नारळ फोडणे याची प्रात्यक्षिके सादर केले.
सुरुवातीस छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन भाजपाचे नेते पृथ्वीराज बाबा पाटील, रा. स्व. संघाचे जिल्हा कार्यवाह नितीनजी देशमाने, नगरसेवक अँड. स्वातीताई शिंदे, शिव कवच मंडळाचे प्रकाश निकम, शिवभक्त राम काळे, सोमनाथ गोटखिंडे, माजी नगरसेविका गीतांजली ढोपे पाटील यांनी केले.
हे ही वाचा:
इराण दूतावासाचा ‘जय महाराष्ट्र!’ ट्रम्पना लगावली चपराक
आग्रीपाड्यात लव्ह जिहाद! हिंदू तरुणींना अश्लील मेसेज पाठवणाऱ्या अश्रफला बेड्या
कच्च्या तेलाच्या किमती १०६ डॉलर्सच्या पुढे
बारामती–राहुरी पोटनिवडणूक; ५५% पेक्षा अधिक मतदान
पहेलगाम मध्ये हिंदूंची धर्म विचारून हत्या करण्यात आली त्याला एक वर्ष पूर्ण झाले म्हणून हिंदू एकता आंदोलनाच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे म्हणाले की, पेहलगाम मध्ये हिंदूंना जात नाही तर धर्म विचारून त्याची हत्या केली, हिंदूंनो आता जात सांगू नका धर्म सांगा. छत्रपती शिवाजी महाराज झाले नसते तर हिंदूची सुन्ता झाली असती. हिंदूंचे ३३ कोटी देवी देवता, मंदिर, मंदिरावरील कळस, दारातील तुळस जिवंत ठेवणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती सर्वत्र मोठ्या प्रमाणात साजरी झाली पाहिजे. तसेच राज्यात मिरवणुकीमध्ये क्रूरकर्मा औरंगजेब, क्रूरकर्मा अफजल खान, क्रूरकर्मा टिपू सुलतान यांचे पोस्टर फडकवून त्यांचे उदात्तीकरण करणाऱ्यांना मिरवणुकीमध्ये घुसून मिरवणूक उधळून लावा.
यावेळी मान्यवरांचा सत्कार शिवोत्सव समितीचे अध्यक्ष अनिरुद्ध कुंभार, दिग्विजय शिंदे, गजानन माने, हरपितसिंग गौड यांनी केले. सूत्रसंचालन हिंदू एकताचे जेष्ठ नेते विजयदादा कडणे यांनी केले.
फटाक्याच्या आतिषबाजी सह छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने कार्यक्रम मोठा जल्लोषात पार पडला.
यावेळी राजू जाधव, अवधूत जाधव, अँड. श्रीपाद होमकर, नारायण हांडे, भूषण गुरव, हरपितसिंग गौड, अक्षय पवार, सुभाष ढमाल सतीश डंबळकर, बाळासाहेब बेलवलकर, प्राध्यापक एच. एन.पाटील सर, शिवाजी पाटील, गजानन मोरे, ओमकार शिंदे, अरविद येतनाळे, सुनिता इनामदार, प्राची कुदळे, अजय काकडे, प्रथमेश खिलारे, सुमित शिंगे, निखिल सावंत आदी शिवभक्त उपस्थित होते.
