ठाण्याच्या मैथिली प्राईडमध्ये स्पॅनिश पाहुण्यांनी रचले दहीहंडीचे थर

ठाण्याच्या मैथिली प्राईडमध्ये स्पॅनिश पाहुण्यांनी रचले दहीहंडीचे थर

वर्तकनगरमधील मैथिली प्राईड गृहनिर्माण सहकारी संस्थेत स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने एक प्रशस्त बाईक रॅली आणि विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते, तसेच दिनांक १६ रोजी सालाबादप्रमाणे दहीहंडीचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता या कार्यक्रमात बार्सिलोना( स्पेन) येथील गोविंदा पथक सहभागी झाले होते त्यांनी येथील हंडी फोडून संस्थेच्या सभासदांसोबत पारंपरिक गाण्यांवर नृत्याचा आनंद लुटला.

हे ही वाचा:

वाईट हवामानामुळे वैष्णो देवी यात्रेचे नोंदणी थांबवली

आंतररिक शांततेसाठी प्रभावी प्राणायाम

अर्ध उष्ट्रासनाने मिळवा पाठदुखीतून आराम

सेप्टिक टँकमध्ये गेलेल्या तिघांचा मृत्यू

या कार्यक्रमांने संस्थेचा परिसर दणाणून गेला लहानथोर सगळ्यांनीच त्यात भाग घेतला होता. मैथिली प्राईड गृहनिर्माण सहकारी संस्थेमध्ये दरवर्षी सर्वच सण मोठ्या आनंदाने आणि जल्लोष पूर्वक साजरे केले जातात.

संस्थेच्या वतीने पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला या वेळी संस्थेच्या अध्यक्षा सौ. अस्मिता जोशी संस्थेचे सचिव पद्माकर भोसले, खजिनदार हेमंत तासखेडकर आणि सांस्कृतिक समितीच्या अध्यक्षा वैशाली कोचारेकर,सांस्कृतिक समन्वयक अभय बांबर्डेकर उपस्थित होते तसेच हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी मैथिली प्राईड सांस्कृतिक मंडळ आणि हर्षद तांडेल यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Exit mobile version