विवान कारूळकरच्या ‘सनातनी तत्त्व’ला भरघोस प्रतिसाद

भगवद्गीतेवरील पोस्ट व्हायरल

विवान कारूळकरच्या ‘सनातनी तत्त्व’ला भरघोस प्रतिसाद

‘सनातन धर्म : ट्रू सोर्स ऑफ ऑल सायन्सेस’ हे पुस्तक लिहिणाऱ्या विवान कारूळकरला सनातन धर्माबद्दल विशेष आस्था आहे. त्याने आता इन्स्टाग्रामवर ‘सनातनी तत्त्व’ नावाचे स्वतःचे पेज सुरू केले असून त्याला लोकांचा उत्तम प्रतिसाद लाभत आहे.

सनातन धर्माविषयी लोकांपर्यंत अधिकाधिक माहिती या पेजच्या माध्यमातून पोहोचवण्याचा त्याचा प्रयत्न असतो.
या पेजवरून त्याने भगवद्गीता हा विषय आता ६ वी ते १० वी तल्या मुलांसाठी अभ्यासक्रमात समाविष्ट केल्याची पोस्ट करून त्याचा नव्या पिढीला कसा फायदा होईल हे सांगितले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र वापरून त्याने भगवद्गीतेचे जीवनातील महत्त्व काय, त्यातून मिळणारी नीतिमूल्ये, त्यातून दिला जाणारा संदेश याविषयी लिहिले आहे. त्या अनुषंगाने केंद्र सरकारचा हा निर्णय किती महत्त्वाचा आहे, हे त्याने विषद केले आहे.

हे ही वाचा:

तुम्ही कोणता आहार घेता?

कूनो राष्ट्रीय उद्यानात चीत्यांचे प्रमाण वाढण्याची अपेक्षा

पाकिस्तानात २.६२ कोटी मुले शाळेबाहेर

आयुर्वेदातील या सवयींमुळे घशाला मिळेल आराम

‘सनातनी तत्त्व’ची ही पोस्ट लोकांना भलतीच आवडली असून तब्बल ८० हजारपेक्षा अधिक लोकांनी ही पोस्ट लाईक केली आहे. जवळपास १८०० लोकांनी यावर प्रतिक्रिया दिली असून १ हजार लोकांनी ती पोस्ट रिपोस्ट केली आहे.

या पेजचे तब्बल ९२ हजार पेक्षा अधिक फॉलोअर्स आहेत. तर या पेजवरून त्याने १२५७ पोस्ट केलेल्या आहेत.
हे सनातन धर्मावरील पहिले पेज आहे. उद्योगपती प्रशांत कारूळकर, सामाजिक कार्यकर्त्या शीतल कारूळकर यांचा विवान हा सुपुत्र आहे.

Exit mobile version