मालवणीतील जमलेले मुस्लीम बंगाली की बांगलादेशी?

मालवणीतील जमलेले मुस्लीम बंगाली की बांगलादेशी?

बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार होत आहेत, भारत बांगलादेशींची मुजोरी सुरू आहे. हे बांगलादेशी इतके माजलेत की, सरकारला उघड उघड आव्हान देत आहेत. हे कुठे गाव खेड्यात घडत नसून देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरात घडते आहे. बांगलादेशींचा अड्डा बनलेल्या मालवणीत २१ डिसेंबर रोजी हजारोंच्या संख्येने बांगली मुस्लीमांचे एकत्र आले. या गर्दीत बांगलादेशींची गर्दी जास्त असण्याची शक्यता आहे. स्थानिक काँग्रेस आमदार हाजी अस्लम शेखच्या पुढाकाराने हे एकत्रिकरण झाले. बांगलादेशींचे हे एकत्रिकरण म्हणजे उघड उघड सरकारला दिलेले आव्हान आहे.

मालवणीत मोठ्या संख्येने सरकारी भुखंडांचा कब्जा घेऊन त्यावर अनधिकृत झोपड्या ठोकण्यात आल्या आहेत. या झोपड्यांमध्ये बांगलादेशींना वसवण्यात येत आहे, हे न्यूज डंकाने अनेकदा पुराव्यांसह जनतेच्या समोर आणले आहे. मालवणीतील मेळाव्याने यावर शिक्कामोर्तब केले आहे.

महायुती सरकारमधील मंत्री मंगलप्रभात लोढा यांना हा विषय हाती घेऊन अनेकदा आंदोलन केले आहे. भाजपाचे स्थानिक नेते ब्रिजेश सिंह तर गेली अनेक वर्षे हा विषय घेऊन ओरड करतायत. परंतु परिस्थिती आता हाताबाहेर गेल्यासारखी आहे. मालवणीत गेट क्रमांक ८ येथे २१ डिसेंबर रोजी बंगाली मुस्लिमांचा मेळावा झाला. हजारो मुस्लीम या कार्यक्रमाला उपस्थित होते. उन्नयन बंगाली असोसिएशनने या मेळाव्याचे आयोजन केले होते. मालवणीचा काँग्रेस आमदार हाजी अस्लम शेख या कार्यक्रमात प्रमुख पाहुणा होता.

बांगलादेशात आज हिंदूंची परिस्थिती बिकट काही आहे. ठेचून मारले जात आहे. घराबाहेर पडण्याची भीती आहे. त्यांचे जीवित, वित्त काहीच सुरक्षित नाही. महिलांची अब्रू सुरक्षित नाही. दुसऱ्या बाजूला भारतात शिरलेले बांगलादेशी मुजोर झालेले आहेत. राजकीय आशीर्वाद असल्यामुळे आपल्याला कोणीही धक्का लावू शकत नाही, याची त्यांना खात्री झालेली आहे. मालवणीत सुरू असलेले अनधिकृत झोपड्यांचे पाड काम अचानक थांबले ते सुरू होण्याचे नाव नाही.

हे ही वाचा:

भारताचा पहिला महिलांच्या नेतृत्वाखालील मुक्त व्यापार करार

म्युच्युअल फंड : एयूएम २०३५ पर्यंत ३०० लाख कोटी रुपयांपुढे जाण्याचा अंदाज

नैसर्गिक शेती सुरू करा

राहुल गांधींकडे ना जनमत, ना संगत, ना जनपथचा पाठिंबा

मालवणीत २१ डिसेंबरला म्हाडाच्या मैदानात बंगाली मुस्लीमांचा मेळावा झाला. हजारोंच्या संख्येन इथे मुस्लीम उपस्थित होते. नारा ए तकबीर अल्ला हो अकबरच्या घोषणा दिल्या जात होत्या. एका बाजूला बांगलादेश आणि पाकिस्तानांत हिंदूंचा वंशविच्छेद केला जातोय. तिथे हिंदूंची लोकसंख्या आक्रसत चालली आहे. दुसऱ्या बाजूला पाकिस्तान आणि बांगलादेशातून आलेल्या घुसखोरांना भारतात बसवले जाते आहे. सगळे नियम कायदे गुंडाळून हे घुसखोर शक्तिप्रदर्शन करतायत मेळावे घेतायत.

मालवणीसारख्या एका भागात बंगाली मुस्लिमांची संख्या एवढी मोठी आहे की, त्यांचा हजारोंचा मेळावा होऊ शकतो. कुठून आले हे बंगाली मुस्लीम भारतात? कधी आले? त्यांना मुंबईथ कोण वसवतोय. ते खरेच भारतीय आहेत का?  असा प्रश्न इथे कोणालाच पडत नाही. वांद्रे ते विरार आणि तिथे सीएसटी ते ठाणे यांच्या वस्त्या निर्माण होत आहेत. त्यांना कागदपत्रे बनवून दिली जात आहेत. त्यांना मतदार बनवले जात आहे. या देशात त्यांना रिचवले जात आहे.

बांगलादेशात सध्या जमात ए इस्लामी प्रायोजित जो हिंदूविरोधी हिंसाचार सुरू आहे, तो केवळ हिंदूंमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी आहे. फेब्रुवारी मार्चमध्ये बांगलादेशात ज्या निवडणुका आहेत, त्या निवडणुकांमध्ये हिंदूंनी मतदार करण्यासाठी बाहेर पडू नये त्यासाठी ही वातावरण निर्मिती केली जाते आहे.

बांगलादेशातील हिंदूंच्या शिरकाणाबाबत रशियासारखा एखादा देश आवाज उठवतो. परंतु शरीफ उस्मान हादीसारखा भारतविरोधी, हिंदूविरोधी जिहादी मारला जातो, त्याचा युरोपातील तमाम देशांना पुळका येतो. अमेरिकेला सहानुभूती वाटते. हादीच्या पाठोपाठ बांगलादेशात मुतालिब सिकदर या कामगार नेत्याच्या डोक्यात गोळ्या घालण्यात आल्या. जातीय श्रमिक शक्ती या कामगार संघटनेचा तो नेता होता. त्याच्या सुदैवाने तो बचावला. जे काही घडतेय ते मोहमद युनूस यांच्या हाताबाहेर गेलेले आहे. बांगलादेशातील हा संघर्ष आणखी पेटणार आहे. निवडणूक होईपर्यंत आणखी काही लोकांचे बळी जातील अशी शक्यता आहे. त्यामुळे २० नेत्यांना संरक्षण देण्यात आले आहे. बांगलादेशातील आपसातल्या मारामाऱ्यांतून विकोपाला गेला आहे. त्याचा वचपा काढला जातोय हिंदूंच्या विरोधात. काहीही घडले तरी हिंदूंना ठेचायचे असा घटनाक्रम इथे सुरू आहे.

बांगलादेशात मुस्लीम बहुसंख्य आहे. त्यामुळे तिथे हिंदू भरडले जात आहेत. भारतात मुस्लीमांची संख्या वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मोठ्या संख्येने बांगलादेशींची भारतात खोगीर भरती सुरू आहे. तिथे हिंदूंना घरातून बाहेर पडणे कठीण झाले आहे. भारतात घुसखोर बांगलादेशी मेळावे घेऊन सरकारला आव्हान देत आहेत. त्यांना कोणाची भीती वाटत नाही. आपल्यावर कारवाई होऊ शकते अशी त्यांना पुसटशी शंकाही येत नाही. उद्या आपले नागरीकत्व सिद्ध करण्याची वेळ आली तर अस्लम शेख सारखे घरभेदी समोर येऊन आपली ढाल बनतील असा त्यांना ठाम विश्वास आहे. बांगलादेशातील खुलना डिव्हीजनमध्ये २०११ मध्ये हिंदूचा टक्का १२.८५ होता, तो २०२२ मध्ये फक्त १.३३ एवढा शिल्लक राहीला. म्हणजे युनस आल्यानंतर हिंदूंवर अत्याचार सुरू झाले आधी सगळे आलबेल होते, असे नाही. अत्याचार आधीपासून सुरू होते. आता ते टीपेला गेले आहेत एवढेच. हीच परीस्थिती सिल्हेट, रंगपूर, मायमेनसिंग डिव्हीजनचे चित्र यापेक्षा वेगळे नाही. कुठेही हिंदूंचा टक्का वाढलेला आहे किंवा स्थिर आहे, असे दिसत नाही.

त्या उलट प.बंगालची परिस्थिती आहे. १९५१ ते २०११ या काळात मुस्लीमांचा टक्का १९.८५ वरुन २०११ च्या जनगणनेत २७ ते ३० टक्क्यांपर्यंत वाढलेला आहे. ही वाढ फक्त प.बंगालमध्ये नाही. इथून ते देशाच्या प्रत्येक राज्यात गेले आहेत. बिहार, उत्तर प्रदेशच्या एसआयआरमध्ये हे स्पष्ट झाले आहे. खरी गंमत येणार आहे महाराष्ट्रात एसआयआर सुरू होईल तेव्हा. महाराष्ट्रात बोगस जन्म प्रमाणपत्रांचा घोटाळा भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी सतत उघड केलेला आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील शेंदूरसानी गावाची वस्ती दीड हजार तिथे तीन महिन्यात २७३९७ जन्म प्रमाण पत्र जारी करण्यात आल्याचे प्रकरण तर अगदी ताजे. हे सगळे प.बंगाल, आसाम, उत्तर भारतातील लोक आहेत. मुळात हे यवतमाळमध्ये कसे आले, हा प्रश्नच आहे. या केवळ तांत्रिक चुका नाहीत. हे षडयंत्र आहे. देशात घुसलेल्या बांगलादेशी आणि रोहिंग्यांना भारतीयत्वाचा टीळा लावण्याचे. हे रॅकेट बांगलादेश, पाकिस्तानातून चालवले जाते. देशात घुसलेल्या बांगलादेशींना या देशाच्या मतदार याद्यांमध्ये रिचवण्याची ही व्यवस्था आहे. राज्य आणि केंद्र सरकारमधील अनेक अधिकारी, कर्मचारी, नेते या षडयंत्रात सहभागी आहेत. या प्रकरणात जे लोक सहभागी आहेत, त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांची रवानगी तुरुंगात करण्याची गरज आहे.

महाराष्ट्रात ही वाळवी कितपत पसरलेली आहे, हे इथे एसआयआर सुरू झाल्याशिवाय उघड होणार नाही. सखोल तपास झाला तरच हे शक्य आहे. उत्तर प्रदेशातील योगी सरकारने घुसखोरांच्या विरोधात कठोर कारवाई सुरू केली तेव्हा, बांगलादेशी आणि रोहिंग्यांनी मशीद आणि मदरशांत आश्रय घेतला. जिथे जिथे मुस्लीमांची पॉकेट्स तयार झाली आहेत, तिथे उभ्या केल्या जाणाऱ्या भव्य अनधिकृत मशिदी फक्त नमाजला जागा कमी पडते म्हणून उभारल्या जात नाहीत. ही घुसखोरांसाठी निर्माण करण्यात आलेली तात्पुरती व्यवस्था आहे. ते मुंबईसारख्या शहरात स्थिरस्थावर होईपर्यंत त्यांची इथे व्यवस्था होते. नंतर त्याची रवानगी मालवणीसारख्या भागात उभारण्यात आलेल्या अनधिकृत झोपड्यांमध्ये होते. उन्नय बंगाली असोसिएशनने जो मेळावा मालवणीत घेतला, त्यात जमलेले बंगाली मुसलमान होते, परंतु त्यात भारतीय किती होते आणि बांगलादेशी किती हे शोधण्याचे काम सरकारचे आहे.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

Exit mobile version