उमर खालिदसाठी अमेरिकेत लॉबिंग; लोकशाही मार्गाने शरीया लागू करण्याचे ममदानीचे कारस्थान

इस्लामी कट्टरवादी लोकशाहीचा बुरखा ओढून सिस्टीम ताब्यात घेतायत

उमर खालिदसाठी अमेरिकेत लॉबिंग; लोकशाही मार्गाने शरीया लागू करण्याचे ममदानीचे कारस्थान

न्यूयॉर्कचा मुस्लीम मेअर जोहरान ममदानी याच्या सह आठ अमेरिकी काँग्रेस सदस्यांनी देशद्रोहाच्या आरोपाखाली तिहार तुरुंगात सजा भोगत असलेल्या देशद्रोही उमर खालिदच्या सुटकेसाठी आवाज उठवला आहे. लोकशाहीचा बुरखा पांघरून काही लोक जगात शरीया लागू करण्याचे षडयंत्र राबतायत. ममदानी त्यापैकी एक आहेत. दिपूचंद्र दास, बजेंद्र बिस्वास यांचे बांगलादेशातील पिसाळलेल्या जमावाने बळी घेतले. या हत्यांबाबत मात्र ममदानी मौन आहे.

भारताचा सिलिगुडी कॉरिडोअर कसा तोडायचा याचे जाहीर भाषणात धडे देणाऱ्या देशद्रोही शर्जील इमाम सोबत सहआरोपी असलेला उमर खालिद सध्या तिहार तुरुंगात आहे. एका सुनावणासाठी लाखो रुपयांची फी घेणारे नामांकीत वकील खालिदला जामीन मिळावा म्हणून सर्वोच्च न्यायालयात लढतायत. तिथे त्यांना दाद मिळत नाही, आता अमेरिकेने त्याच्या सुटकेसाठी भारतावर दबाव आणावा म्हणून लॉबिंग करण्यासाठी त्याचे आई-वडील अमेरिकेत गेले.

जेएनयूचा माजी विद्यार्थी असलेला उमर खालिद उघडपणे भारत तोडण्याची भाषा करत होता. त्याने दहशतवादी मकबूल भट, अफजल गुरूच्या सुटकेसाठी आंदोलने केली. तरीही या देशातील लोकांनी त्याचा दिपूचंद्र दास, किंवा बजेंद्र बिस्वास केला नाही. देशाच्या कायद्यानुसार त्याला अटक झाली. त्याच्याविरोधात रितसर खटला चाललेला आहे. देशद्रोहाचा आरोप असल्यामुळे त्याला जामीन मिळत नाही. एरव्ही घटनेच्या नावाने गजर करणारी ही मंडळी देशाच्या कायद्याने दिलेल्या न्यायावर मात्र विश्वास ठेवत नाहीत. स्वत:च्या देशाच्या कायद्याच्या विरोधात दाद मागायला अमेरिकेसारख्या देशाचे उंबरे झिजवतायत.

उमर खालिद हा खानदानी देशद्रोही आहे. त्याचा बाप सय्यद कासिम रसूल इलियास हा मूळचा महाराष्ट्राचा. एके काळी बंदी घातलेल्या स्टुटंण्ट इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडियात सक्रीय होता. सध्या हा त्याच्या पत्नी सोबत अमेरिकेच्या दौऱ्यावर आहे. अमेरिकी काँग्रेसच्या सदस्यांची याने भेट घेतली. त्यानंतर आठ सदस्यांनी त्याला जामीन मिळावा आणि त्याच्याविरोधातील खटला नि:पक्षपातीपण चालावा म्हणून वॉशिंग्टन येथील भारतीय राजदूतांना पत्र दिलेले आहे. अमेरिकी नेत्यांचे एक वैशिष्ट्य राहिले आहे. त्यांचे लक्ष जगातील प्रत्येक घडामोडीवर असते. प्रत्येक घडामोडीवर ते व्यक्त होत असतात, मात्र पायाखाली काय जळते आहे, याकडे त्यांचे कधीच लक्ष नसते. ब्रिटनप्रमाणे अमेरिकेच्या राजकारणाच्या इस्लामीकरणाची सुरूवात झाली आहे. ममदानी त्याचे सगळ्यात मोठे उदाहरण आहे.

हे ही वाचा:

जगभरात १,१६४ कोटींची कमाई करणारा ‘धुरंधर’ लडाखमध्ये करमुक्त!

… म्हणून दिल्ली सरकार अरविंद केजरीवालांविरुद्ध एफआयआर दाखल करणार

२०२६ मध्ये भारताची अर्थव्यवस्था सुमारे ६ ते ७ टक्क्यांनी वाढणार

राहुल गांधींचा दावा खोटा; कर्नाटकचे सर्वेक्षण म्हणते ईव्हीएम योग्य!

न्यूयॉर्कचा मेयर जोहरान ममदानी याचीही खालिदच्या आई वडीलांनी भेट घेतली. ममदानीने खालिदसाठी एक पत्र दिले आहे. त्याच्या आई वडीलांना भेटून आनंद झाला असे सांगत खालिदच्या विचारांचे आणि संघर्षाचे ममदानी याने समर्थन केले आहे.

खालिदचे हिरो अफजल गुरु आणि मकबूल भट हे काश्मीरी दहशतवादी आहेत. भारत तोडणे ही त्याची विचारधारा आहे. त्याचा संघर्षही त्याच साठी सुरू आहे. तरीही हा ममदानी खालिदच्या विचारांशी सहमत आहे, याचा अर्थ भारत तोडणे, इथे अल्लाच्या आदेशाने गझवा ए हिंद करणे, हे ममदानी याचेही विचार आहेत.

हा न्यूयॉर्कचा मेयर झाला तेव्हा भारतातल्या अनेक बांडगुळांना आनंद झाला होता. मेयर बनताना त्याने कुराणावर हात ठेवून शपथ घेतली, याचेही अनेकांना कौतुक वाटले. हा ममदानी किती विषारी आहे, त्याच्या मनात भारतविरोध किती ठासून भरला आहे, हे त्याच्या ताज्या कृतीवरून पुन्हा एकदा उघड झाले आहे. यापूर्वीही त्याने उमर खालिदचे समर्थन केले आहे.

देशात जे देशद्रोही आहेत, कट्टरवादी आहे, नक्षलवादी आहेत, त्यांची पोच जागतिक स्तरावर आहे, हे या निमित्ताने पुन्हा एकदा उघड झाले आहे. जेव्हा या फुटीरवाद्यांच्या विरोधात कायद्याचा पाश आवळला जातो तेव्हा अमेरिका, ब्रिटन, जर्मनीतून उसासे यायला लागतात. भारतात लोकशाही धोक्यात आल्याची ओरड सुरू होते. जणू हे नक्षलवादी, दहशतवादी, फुटीरवादी म्हणजेच या देशातील लोकशाही आहे. यांची इको सिस्टीम सरकारला धडक देण्याइतपत शक्तीशाली आहे. पैसा, राजकीय शक्ती कोणत्याही बाबतीत ते मागे नाहीत. देशातील एका देशद्रोही चिलटासाठी अमेरिकेतून आवाज उठतो. त्याला समर्थन मिळते. खालिदच्या परिवाराला पैशाचीही कमतरता नसते.

सर्वोच्च न्यायालयात खालिदसाठी खटला लढतायत कपिल सिब्बल, देशातील दहशतवादी, नक्षलवादी, देशद्रोह्यांची बाजू न्यायालयात मांडण्याचे काम हे ताकदीने करत असतात. एका सुनावणीसाठी सिब्बल १० ते १५ लाख रुपये फि घेतात. सिब्बल यांच्यासारखे वकील खालिदच्या परिवाराला परवडणार नाही हे निश्चित. मग हा पैसा येतो कुठून, कोण हा खर्च उचलतो? हे प्रश्न अनुत्तरीत राहतात.

या देशात एकेका देशद्रोह्याला किती आर्थिक बळ दिले जाते हे समजून घ्या. खालिदला कपिल सिब्बल सारखे वकील मिळू शकतात. त्याचे आई वडील अमेरिकेत जाऊ शकतात, तिथे राहून देशद्रोही मुलासाठी काँग्रेसचे सदस्य, ममदानीसारखे कट्टरवादी आणि अमेरिकेतील वजनदार लोकांकडे लॉबिंग करू शकतात. अमेरिकेत लॉबिंग हा व्यवसाय आहे. अनेक कंपन्या व्यवस्थित पैसे घेऊन तुम्हाला कोणत्याही वजनदार नेत्याकडे नेऊ शकतात.

अमेरिकेत जायचा, राहायचा, फिरण्याचा, खाण्याचा खर्चच सामान्य माणसाच्या आवाक्याच्या बाहेरचा आहे. हा खर्च करून अमेरिकेत लॉबिंग करण्याचे बळ खालिदच्या आई-वडीलांना हे सगळे कसे परवडते ? सय्यद कासिम रसूल इलियास कडे इतका पैसा आला कुठून? हा पैसा त्याचा नसेल तर ही आर्थिक रसद त्याला कोण पुरवते आहे? त्याच्या पाठीशी कोण उभा आहे? भारतात हे प्रश्न कोणालाच पडत नाहीत.

भारतात तुम्ही देशाच्या विरोधात उभे राहीलात तर तुम्हाला मदत करण्यासाठी देशविदेशातील लोक उभे असतात. एक अति विशाल अशी इको सिस्टीम त्यांच्या पाठीशी उभी राहते. बांगलादेशात जाळल्या गेलेल्या दिपूचंद्र दास, बजेंद्र बिस्वास याच्या कुटुंबियांच्या वाट्याला एवढेही सुख नाही. त्यांना तर उघडपणे अश्रू ढाळण्याचे आणि आक्रोश करण्याची सुद्धा मुभा नाही.

जगभरात कट्टतावादाच्या विरोधात उठाव होतो आहे. दुसऱ्या बाजूला हे इस्लामी कट्टरवादी लोकशाहीचा बुरखा ओढून सिस्टीम ताब्यात घेण्याचा प्रयत्न करतायत. लोकशाही संपवणे आणि जगभरात शरीया लागू करणे हे त्यांचे अंतिम ध्येय आहे. ते साध्य करण्यासाठी लोकशाही मार्गाचा वापर होतो आहे. ममदानीने मेयर पदावर विराजमान होताना कुराणाची शपथ घेतली आहे. कुराणाला फक्त शरीया मंजूर आहे. लोकशाहीचा आणि इस्लामचा काही संबंध नाही. असता तर कट्टर इस्लामी राजवट असलेल्या इराणमध्ये जनता रस्त्यावर कशाला उतरली असती ?

इऱाणमध्ये अयातुल्ला खोमेनी यांच्या कट्टरवादी राजवटीविरुद्ध जनतेने मोठा उठाव केला आहे. दहा विद्यापीठातील विद्यार्थी या उठावात सहभागी आहेत. मोठ्या संख्येने सरकारी इमारतींची जाळपोळ सुरू आहे. २०२२ मध्ये हिजाबची सक्ती नाकारणाऱ्य महसा अमिनी या तरुणीचा पोलिस कोठडीत मृत्यू झाल्यानंतर इराणमध्ये प्रचंड आक्रोश निर्माण झाला होता. तो किरकोळ वाटावा अशी परिस्थिती इराणमध्ये निर्माण झालेली आहे. हा आक्रोश तिथल्या डळमळत्या आर्थिक स्थितीमुळे आहेच. इराणच्या ४२,१२५ रियालची किंमत एक अमेरिकी डॉलरच्या बरोबर झालेली आहे. चलन साफ कोसळले आहे. परंतु हा आक्रोश फक्त तिथल्या कट्टरवादी राजवटीच्या विरोधातही आहे. इराणच्या अर्थकारणावर ही परिस्थिती तिथल्या कट्टरवादी राजवटीमुळेही आलेली आहे. राजधानी तेहरान, शिराज, तब्रीज, इस्फहान, मशहाद या शहरात कट्टरवाद्यांच्या विरोधात इराणची जनता रस्त्यावर उतरलेली आहे.

एका बाजूला जगातील सर्वात कटवड इस्लामी राजवटीचे विसर्जन होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. दुसऱ्या बाजूला जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या अमेरिकेच्या आर्थिक राजधानीत न्यूयॉर्क शहराचा मेयर एक कट्टरवादी बनला आहे. तो जगातील सगळ्यात मोठी लोकशाही असलेल्या भारतातील उमर खालिद नावाच्या एका कट्टरवाद्यासाठी आवाज उठवतो आहे.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

Exit mobile version