ब्राझीलमध्ये ड्रग्ज टोळ्यांविरोधातील कारवाईत १२१ जणांचा मृत्यू

मृतांमध्ये चार पोलिस अधिकाऱ्यांचाही समावेश

ब्राझीलमध्ये ड्रग्ज टोळ्यांविरोधातील कारवाईत १२१ जणांचा मृत्यू

ब्राझीलमध्ये पोलिसांनी ड्रग्ज माफियांविरोधात आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई सुरू केली. तब्बल २,५०० पोलिस अधिकाऱ्यांनी एकाच वेळी हेलिकॉप्टरचा वापर करून ब्राझीलची राजधानी रिओ दि जानेरोच्या अनेक भागात छापे टाकले. या छाप्यादरम्यान आतापर्यंत १२१ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. यात चार पोलिस अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. या रक्तरंजित कारवाईनंतर नागरिक पोलिसांवर अतिरेकी बळाचा वापर केल्याचा आरोप करत आहेत. तसेच राज्यपालांच्या राजीनाम्याची मागणी करत निदर्शने करत आहेत. ब्राझीलच्या सर्वोच्च न्यायालयानेही संपूर्ण घटनेचा अहवाल मागितला आहे.

रिओ दि जानेरोमध्ये ड्रग्ज टोळ्यांविरुद्ध पोलिसांनी केलेल्या प्राणघातक कारवाईत किमान १२१ जणांचा मृत्यू झाल्यानंतर बुधवारी ब्राझीलमध्ये निदर्शने सुरू झाली. छाप्यांचे रूपांतर पोलिस आणि संघटित गुन्हेगारी गटांच्या सदस्यांमध्ये गोळीबारात झाले. या हत्याकांडात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये चार पोलिस अधिकारीही होते. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, रिओ दि जानेरोमधील कोमांडो व्हर्मेल्हो किंवा रेड कमांड नावाच्या टोळीला लक्ष्य करून हे छापे टाकण्यात आले. शहरातील अनेक भागांमध्ये ही टोळी ड्रग्ज व्यापार नियंत्रित करते. एका दिवसातील सर्वात घातक पोलिस कारवाईंपैकी एक असलेल्या या कारवाईच्या क्रूरतेचा संयुक्त राष्ट्रांनी निषेध केला.

मंगळवारी, रिओ दि जानेरोमधील पोलिसांनी हेलिकॉप्टर, बुलेट प्रुफ वाहने आणि पायी चालत रेड कमांड टोळीविरुद्ध प्राणघातक कारवाई सुरू केली. या कारवाईत क्रॉस फायरिंग झाली आणि गोंधळ निर्माण झाला, ज्यामुळे शाळा बंद करण्यात आल्या, विद्यापीठांमधील वर्ग रद्द करण्यात आले आणि रस्ते बंद करण्यात आले. हे ऑपरेशन राज्य सैन्याने संघीय पाठिंब्याशिवाय सुरू केले होते आणि रिओ दि जानेरोचे गव्हर्नर यांनी युद्धाची सुरुवात म्हणून वर्णन केले होते.

हे ही वाचा : 

ट्रम्प यांच्या नावाने बनावट आधार प्रकरणात आमदार रोहित पवारांवर गुन्हा दाखल

अफगाण सीमेजवळ झालेल्या चकमकीत पाक लष्कराच्या कॅप्टनसह सहा सैनिक ठार

पंजाबमधील आप आमदारावर अपहरणाचा गुन्हा; मुलांचीही नावे एफआयआरमध्ये

रशिया, चीनच्या हालचालींनंतर ट्रम्प अलर्ट; अणुचाचण्यांचे दिले आदेश!

रिओ पोलिसांनी आतापर्यंत १२१ जणांच्या मृत्यूची पुष्टी केली आहे, ज्यामध्ये चार पोलिसांचाही समावेश आहे, असे वृत्तसंस्था रॉयटर्सने दिले आहे. या कारवाईची वाढलेली प्राणघातकता अपेक्षित होती पण ती नकोशी होती, असे रिओ राज्याचे सुरक्षा प्रमुख व्हिक्टर सॅंटोस म्हणाले. त्यांनी सांगितले की, पोलिसांच्या कोणत्याही गैरवर्तनाची देखील चौकशी केली जाईल.

या कारवाईवर आणि त्यामुळे झालेल्या जीवितहानींवर टीका करताना, संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार कार्यालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, “आम्ही अधिकाऱ्यांना आंतरराष्ट्रीय मानवाधिकार कायद्यांतर्गत त्यांच्या जबाबदाऱ्यांची आठवण करून देतो आणि त्वरित आणि प्रभावी चौकशीचा आग्रह करतो.

Exit mobile version