अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नावाने बनावट आधार कार्ड तयार केल्याच्या आरोपावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्याविरुद्ध दक्षिण विभाग सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सायबर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भाजपच्या सोशल मीडिया समन्वयकाने याबाबत तक्रार दाखल केली होती. तक्रारीत पवार हे सोशल मीडियावर बनावट कागदपत्रे तयार करून प्रसारित करण्यात सहभागी असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
पोलिसांनी संबंधित बनावट आधार कार्डचे मूळ, त्याची डिझाइन व प्रसाराची साखळी शोधण्यासाठी चौकशी सुरू केली आहे. सायबर विभागाने डिजिटल पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
हे ही वाचा :
अफगाण सीमेजवळ झालेल्या चकमकीत पाक लष्कराच्या कॅप्टनसह सहा सैनिक ठार
पंजाबमधील आप आमदारावर अपहरणाचा गुन्हा; मुलांचीही नावे एफआयआरमध्ये
रशिया, चीनच्या हालचालींनंतर ट्रम्प अलर्ट; अणुचाचण्यांचे दिले आदेश!







