इथे पाकिस्तान घामाघूम, तिथे बलुच लिबरेशन आर्मीने फेस आणला…

जाळली सरकारी कार्यालये

इथे पाकिस्तान घामाघूम, तिथे बलुच लिबरेशन आर्मीने फेस आणला…

एकीकडे भारताकडून हल्ला केला जाईल का, या चिंतेत पाकिस्तान असताना त्यांना बलुचिस्तानमधील बलुच लिबरेशन आर्मीच्या (बीएलए) बंडखोरीचा सामना करावा लागतो आहे. पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात बलुच लिबरेशन आर्मी (बीएलए) च्या फतेह स्क्वॉड ने क्वेटा-कराची महामार्ग (N-25) अडवून वाहने तपासली आणि अनेक सरकारी इमारतींवर हल्ला केला.

कलातच्या मोंगोचार बाजारात बीएलएच्या सदस्यांनी नेशनल डेटाबेस अँड रजिस्ट्रेशन अथॉरिटी (NADRA) न्यायिक संकुल (Judicial Complex), नॅशनल बँक ऑफ पाकिस्तान यांसारख्या सरकारी इमारतींमध्ये तोडफोड केली आणि आग लावली. सुरक्षा सूत्रांनुसार या इमारतींना मोठे नुकसान झाले असून, हल्लेखोर सुरक्षा दल पोहोचण्यापूर्वीच पसार झाले.

हे ही वाचा:

मनीष सिसोदिया आता ‘या’ प्रकरणात अडकले!

तेल अवीवमध्ये क्षेपणास्त्र हल्ला, दिल्लीहून येणारे एअर इंडियाचे विमान अबू धाबीला वळवले!

पंजाब: पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या दोघांना अटक!

खोल दरीत कोसळले सैन्याचे वाहन, ३ जवानांचा मृत्यू

 

बीएलएने मोंगोचार परिसरात एक पोलीस वाहन थांबवून त्यावर हल्ला केला, जे गदानी जेलमधून क्वेटा व माचच्या जेलकडे कैद्यांना नेत होते. या हल्ल्यात किमान १० कैद्यांची सुटका करण्यात आली. ५ पोलीस कर्मचारी बंधक बनवले गेले आणि त्यांची शस्त्रेही लुटली. दोन पोलीस कर्मचारी, जे सादर कपड्यांत होते, ते मात्र सुरक्षित राहिले.

हल्ल्याचा हेतू व सुरक्षा आव्हान

राजकीय विश्लेषक कमरान युसूफ यांच्या मते, हा हल्ला कैद्यांची नियोजित सुटका करण्यासाठीच करण्यात आला.
ते म्हणाले, “आतंकवाद्यांना माहित होते की कैदी पोलीस वाहनांमध्येच असतील, म्हणून त्यांनी महामार्ग रोखून ही कारवाई केली.” ही घटना बलुचिस्तानमधील अस्थिर सुरक्षा परिस्थितीचे संकेत देत असून बीएलएसारख्या संघटनांचे स्थानिक समर्थन नेटवर्क सुरक्षा दलांसाठी मोठे आव्हान बनले आहे. हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी परिसरात ऑपरेशन सुरू केले आणि क्वेटा-कराची राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक पुन्हा पूर्ववत केली आहे.

Exit mobile version