पंजाब पोलिसांनी पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याप्रकरणी अमृतसर येथून दोघांना अटक केली आहे. पलक शेर मसीह आणि सूरज मसीह अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे दोघेही अमृतसरमधील लष्करी छावणी आणि हवाई दलाच्या तळाची संवेदनशील माहिती आणि छायाचित्रे पाकिस्तानातील आयएसआयला पाठवत होते. यासाठी त्यांना सिम कार्ड आणि फोन देण्यात आला होता.
तपासादरम्यान, त्यांच्याकडून लष्कराशी संबंधित गोपनीय कागदपत्रे आणि छायाचित्रे देखील जप्त करण्यात आली आहेत. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, प्राथमिक तपासात त्यांचे पाकिस्तानी गुप्तचर संस्थांशी संबंध असल्याचे संकेत मिळाले आहेत. पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थांनी अमृतसर तुरुंगात बंद असलेल्या हरप्रीत सिंग उर्फ हॅप्पी मार्फत या लोकांशी संपर्क साधल्याची माहिती मिळत आहे.
हे ही वाचा :
तेल अवीवमध्ये क्षेपणास्त्र हल्ला, दिल्लीहून येणारे एअर इंडियाचे विमान अबू धाबीला वळवले!
मनीष सिसोदिया आता ‘या’ प्रकरणात अडकले!
अभिनेत्री वाणी कपूरने ‘अबीर गुलाल’ चित्रपटाच्या पोस्ट इंस्टावरून हटवल्या?
‘जम्मू-काश्मीर हल्ल्याचा बदला घेईपर्यंत पुष्पगुच्छ नको!’
आरोपी सूरज मसीह आणि पलक शेर मसीह हे अमृतसरच्या बलहडवाल येथील रहिवासी आहेत. दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पंजाबचे डीजीपी गौरव यादव म्हणाले की, दोन्ही आरोपींनी आतापर्यंत पाकिस्तानला कोणती माहिती दिली आहे आणि त्यामागे त्यांचा हेतू काय होता? याचा तपास केला जात आहे. या कृत्यात त्यांच्यासोबत आणखी कोणाचा सहभाग आहे का? याचा देखील तपास पोलिसांकडून केला जात आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.