लाहोर स्फोटांनी हादरले! सायरन वाजताच नागरिकांची पळापळ

तीन स्फोट झाल्याची माहिती

लाहोर स्फोटांनी हादरले! सायरन वाजताच नागरिकांची पळापळ

भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तान आणि पीओकेमधील दहशतवादी तळांना लक्ष्य करण्यात आले. भारताने नऊ ठिकाणी हवाई हल्ले केल्यानंतर पाकिस्तानमध्ये खळबळ उडाली होती. यानंतर गुरुवार, ८ मे रोजी सकाळी पूर्व पाकिस्तानातील लाहोर शहरात अनेक स्फोट माहिती समोर आली आहे. यामुळे पाकिस्तानी नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण असल्याचे समोर आले.

स्थानिक प्रसारक जिओ टीव्ही आणि रॉयटर्सने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी पाकिस्तानच्या लाहोरमध्ये मोठा स्फोट ऐकू आला. भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी तळांवर हल्ला केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी हा स्फोट झाला. हा स्फोट कशामुळे झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. परिसरात सायरनचा आवाज वेगाने ऐकू आला आणि यामुळे लोकांमध्ये घबराट पसरली, मोठ्या संख्येने लोक घराबाहेर पडले. मात्र, भारताने पाकिस्तानविरुद्ध कोणत्याही नवीन लष्करी कारवाईची पुष्टी केलेली नाही.

लाहोर पोलिसांच्या माहितीनुसार, लाहोरच्या वॉल्टन रोडवर जोरदार स्फोट झाला आहे. सुमारे २ ते ३ स्फोट झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. हे स्फोट इतके जोरात होते की नागरिक घराबाहेर धावून आले. सध्या स्फोटांचे कारण आणि जीवितहानीबाबत कोणतीही निश्चित माहिती मिळालेली नाही. पोलिस घटनास्थळी पोहोचले असून, कोणीही त्या ठिकाणी जाऊ नये असे सांगण्यात आले आहे. दरम्यान, भारताने केलेल्या हवाई कारवाईनंतर कराची, लाहोर आणि सियालकोट विमानतळांवरील उड्डाणे तात्पुरती स्थगित करण्यात आली आहेत.

हे ही वाचा : 

गंगोत्रीकडे जाणारे हेलिकॉप्टर कोसळून पाच भाविकांचा मृत्यू

ऑपरेशन सिंदूरवर खुश थरूर!

पाकची लाज निघाली; भारताची लढाऊ विमाने पाडल्याचा पुरावा मागताचं दिला सोशल मिडीयाचा हवाला

आता कुठे खेळ सुरू झालाय…

लाहोरमधील हे स्फोट अशा वेळी घडले, जेव्हा ६ मे – ७ मेच्या दरम्यान भारतीय लष्कराने पहलगाम हल्ल्याच्या प्रत्युत्तरात ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवले. भारतीय लष्कराने पाकिस्तानमधील नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. पाकिस्तानच्या इंटर सर्व्हिस पब्लिक रिलेशन (ISPR) च्या प्रमुख जनरल अहमद शरीफ चौधरी यांनी सांगितले की, या हवाई हल्ल्यांमध्ये किमान २६ जण ठार झाले असून ४६ जण जखमी झाले आहेत. हे हल्ले पीओके आणि पंजाब प्रांतातील त्या भागांमध्ये करण्यात आले जिथे भारतानुसार दहशतवादी तळ होते. ही परिस्थिती लक्षात घेता पाकिस्तानमध्ये रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. सर्व शासकीय रुग्णालयांना सज्ज राहण्याच्या सूचना दिल्या आहेत, देशाच्या हवाई सीमा काही तासांसाठी बंद करण्यात आल्या आहेत, इस्लामाबाद आणि पंजाबमधील सर्व शाळा-कॉलेज बंद करण्यात आले आहेत आणि सुरक्षा दलांना सतर्क करण्यात आले आहे.

Exit mobile version