फ्रान्सचे पंतप्रधान लेकोर्नू यांचा राजीनामा; शपथविधीनंतर अवघ्या २७ दिवसांत पदत्याग!

युतीतील नेते आणि विरोधकही होते नाराज

फ्रान्सचे पंतप्रधान लेकोर्नू यांचा राजीनामा; शपथविधीनंतर अवघ्या २७ दिवसांत पदत्याग!

फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी नियुक्त केलेले पंतप्रधान सेबॅस्टियन लेकोर्नू यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अवघ्या २७ दिवसांतच राजीनामा दिला आहे. त्यामुळे ते फ्रान्सच्या इतिहासातील सर्वात कमी कालावधीसाठी पंतप्रधानपद भूषवणारे नेते ठरले आहेत.

लेकोर्नू यांनी ९ सप्टेंबर २०२५ रोजी पंतप्रधानपदाची शपथ घेतली होती, आणि ५ ऑक्टोबर रोजी मंत्रिमंडळाची घोषणा केली. केवळ एकाच महिन्याच्या आत, ६ ऑक्टोबर रोजी मंत्रिमंडळ बैठकीनंतर त्यांनी राजीनामा सादर केला.

मंत्रिमंडळ रचनेवरून नाराजी

लेकोर्नू यांच्या नवीन मंत्रिमंडळात मागील सरकारातील १२ मंत्र्यांचा समावेश करण्यात आला होता. यामुळे त्यांच्या स्वतःच्या युतीतील नेते आणि विरोधक दोघेही नाराज झाले होते. मंत्रिमंडळात नवीन चेहऱ्यांना स्थान न दिल्यामुळे राजकीय अस्वस्थता वाढली, आणि सरकारवरील दबाव तीव्र झाला.

मॅक्रॉनचे विश्वासू, पण टिकाव लागला नाही

सेबॅस्टियन लेकोर्नू यांना राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांचे निकटवर्ती आणि विश्वासू मानले जाते. त्यांनी संसदीय बहुमत गमावल्यामुळे राजीनामा दिलेल्या माजी पंतप्रधान फ्रँकोइस बायरो यांची जागा घेतली होती. मात्र, राजकीय अस्थिरता आणि अंतर्गत दबावामुळे त्यांचा कार्यकाळ अल्पायुषी ठरला.

हे ही वाचा :

इल्युजन ऑफ ट्रुथ; २०१६चे संशोधन, काँग्रेसचे राजकारण

ज्यांना देशाची पर्वा नाही, त्याला जननायक बनवण्याचा प्रयत्न करतेय काँग्रेस

सरन्यायाधीशांवर बूट फेकण्याचा प्रयत्न करणारा वकील निलंबित

आत्मनिर्भर भारताचे मोठे पाऊल

दरम्यान, लेकॉर्नू यांच्या राजीनाम्यामुळे फ्रान्समध्ये पुन्हा एकदा राजकीय अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन पुढे कोणाला पंतप्रधान म्हणून नियुक्त करणार, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

Exit mobile version