बांगलादेशमध्ये हिंदू व्यावसायिकाला चाकूने मारहाण करून जाळले

तलावात उडी मारल्याने खोकन चंद्र थोडक्यात बचावले; प्रकृती गंभीर

बांगलादेशमध्ये हिंदू व्यावसायिकाला चाकूने मारहाण करून जाळले

बांगलादेशमध्ये अल्पसंख्यांक विशेषतः हिंदुंवर होणाऱ्या हल्ल्यांनी आणि अत्याचाराने टोक गाठले आहे. एका हिंदू व्यावसायिकाला जमावाने मारहाण करून, चाकूने वार केले आणि त्याला जाळण्याचा प्रयत्न केला. व्यावसायिकाने तलावात उडी मारल्याने सुदैवाने ते बचावले. खोकन चंद्र असे व्यावसायिकाचे नाव असून त्यांना गंभीर दुखापत झाली आहे.

नव वर्षाच्या पूर्वसंध्येला हा क्रूर हल्ला झाला जेव्हा ४० वर्षीय खोकन हे केउरभंगा बाजारातील त्यांचे औषध दुकान बंद करून घरी परतत होते. रात्री ९ वाजण्याच्या सुमारास जेव्हा ते तिलोई परिसरात पोहोचले तेव्हा काही गुंडांनी त्यांना अडवले आणि त्यांच्यावर हल्ला केला. हल्लेखोरांनी त्यांच्यावर धारदार शस्त्रांनी अनेक वार केले, त्यानंतर शरीरावर पेट्रोल ओतले आणि त्यांना पेटवून दिले. यादरम्यान खोकन यांनी जवळच्या तलावात उडी मारली यामुळे त्यांचा जीव वाचला. त्यानंतर स्थानिकांनी त्यांचा जीव वाचवला. खोकन यांना तातडीने शरीयतपूर सदर रुग्णालयात दाखल करण्यात आले, डॉक्टरांनी त्याची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले. हल्ल्यामागील हेतू आणि त्यात सहभागी असलेल्यांची ओळख अद्याप पटलेली नाही.

हे ही वाचा:

डबघाईला आलेल्या अर्थव्यवस्थेवरून इराणमध्ये हिंसक निदर्शने; सात जणांचा मृत्यू

डिजिटल पेमेंटमध्ये भारताची मोठी झेप

केकेआरच्या मुस्तफिजूर निवडीवर वाद

चालत्या कारमध्ये आग, एका वर्षाच्या बाळाचा मृत्यू

भारतविरोधी युवा नेता शरीफ उस्मान हादी याच्या हत्येनंतर झालेल्या हल्ल्यांच्या आणि लिंचिंगच्या मालिकेत खोकन यांच्यावरील हल्ल्यामुळे अल्पसंख्याक हिंदू समुदायात तणाव वाढला आहे. तसेच भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यापूर्वी बांगलादेशातील मैमनसिंग येथील एका कपड्याच्या कारखान्यात सुरक्षा ड्युटीवर असताना बजेंद्र बिस्वास नावाच्या आणखी एका हिंदू व्यक्तीची गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याच्या एका दिवसानंतर ही घटना घडली आहे. गेल्या आठवड्यात, अमृत मंडल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एका व्यक्तीची खंडणीच्या आरोपावरून मारहाण करून हत्या करण्यात आली. ईशनिंदेच्या आरोपावरून कारखान्यातील कामगार दीपू चंद्र दास यांची हत्या झाल्यानंतर काही दिवसांतच ही घटना घडली.

Exit mobile version