“गाझामधील शांतता योजनेला आणखी विलंब झाल्यास…” ट्रम्प यांनी काय इशारा दिला?

प्रस्तावाचा पहिला टप्पा या आठवड्यात पूर्ण होण्याची शक्यता

“गाझामधील शांतता योजनेला आणखी विलंब झाल्यास…” ट्रम्प यांनी काय इशारा दिला?

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, गाझामधील युद्ध संपवण्यासाठी आणि हमासने ताब्यात घेतलेल्या ओलिसांची सुटका करण्यासाठी वाटाघाटी वेगाने असून कराराचा पहिला टप्पा या आठवड्यात पूर्ण होऊ शकतो. ट्रम्प यांच्या शांतता योजनेनुसार हमासने गाझामधील सत्ता आणि नियंत्रण सोडले नाही तर हमासला पूर्णपणे नष्ट केले जाईल, असा इशारा दिल्यानंतर काही तासांतच ट्रम्प यांचे हे विधान आले आहे. हमासला दिलेली अंतिम मुदत रविवारी वॉशिंग्टन वेळेनुसार संध्याकाळी ६ वाजता संपली तर, सोमवारी भारतीय वेळेनुसार पहाटे ३:३० वाजता संपली.

ट्रुथ सोशलवरील एका पोस्टमध्ये ट्रम्प म्हणाले की, आठवड्याच्या शेवटी हमास आणि जगभरातील देश अरब, मुस्लिम आणि इतर सर्वजण यांच्यात खूप सकारात्मक चर्चा झाली. ही चर्चा युद्ध संपवण्याच्या आणि मध्य पूर्वेतील दीर्घकाळापासूनची शांतता साध्य करण्याच्या व्यापक प्रयत्नांचा एक भाग आहे. मला सांगण्यात आले आहे की पहिला टप्पा या आठवड्यात पूर्ण झाला पाहिजे आणि मी सर्वांना जलद गतीने पुढे जाण्यास सांगत आहे. त्यांनी असा इशाराही दिला की आणखी विलंब झाल्यास मोठ्या प्रमाणात रक्तपात होऊ शकतो.

हमासचे निर्वासित गाझा प्रमुख खलील अल-हय्या यांच्या नेतृत्वाखालील एक शिष्टमंडळ रविवारी उशिरा शर्म अल-शेख येथे चर्चेत सहभागी होण्यासाठी इजिप्तला पोहोचल्याने नव्याने झालेल्या वाटाघाटींना वेग आला. युद्ध थांबवण्यासाठी आणि ओलिसांना सोडण्याच्या उद्देशाने अमेरिकेने समर्थित योजनेवर चर्चेसाठी स्ट्रॅटेजिक अफेयर्स मंत्री रॉन डर्मर यांच्या नेतृत्वाखाली इस्रायली वाटाघाटी करणारे सोमवारी येणार होते. डोनाल्ड ट्रम्पच्या गाझा योजनेवरील चर्चेत भाग घेण्यासाठी सोमवारी स्ट्रॅटेजिक अफेयर्स मंत्री रॉन डर्मर यांच्या नेतृत्वाखालील इस्रायली शिष्टमंडळ इजिप्तला जाणार आहे.

हे ही वाचा:

‘चार वेळा दहशतवाद्यांना भेटलो’

पूरस्थितीच्या नुकसानीचा अहवाल पाठवा, मोदी विनाविलंब मदत देणार!

बिहार निवडणुकीपूर्वी ‘बुरख्या’वरून वाद!

दंत शस्त्रक्रिया पदवीधारक तरुणाची अमेरिकेत गोळी घालून हत्या!

अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो म्हणाले की, योजनेच्या पहिल्या टप्प्याची अंमलबजावणी करण्याबाबत हमास गंभीर आहे की नाही हे ठरवण्यासाठी पुढील काही दिवस महत्त्वाचे असतील. ट्रम्प यांच्या प्रस्तावित २० कलमी योजनेचा पहिला टप्पा गाझामधील ४८ उर्वरित बंधकांच्या सुटकेवर केंद्रित आहे, ज्यात २० बंधक हे जिवंत असल्याचे मानले जाते, त्या बदल्यात पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका होणार आहे.

दरम्यान, हमासने गाझा युद्ध संपवण्याच्या ट्रम्प यांच्या पुढाकाराचे स्वागत केले आणि म्हटले की त्यांनी त्यांच्या २०-कलमी शांतता प्रस्तावातील काही प्रमुख भाग स्वीकारले आहेत, ज्यात संघर्ष संपवणे, इस्रायलची माघार आणि इस्रायली बंधक आणि पॅलेस्टिनी बंदिवानांची सुटका यांचा समावेश आहे.

Exit mobile version