भारताने चार दिवसांत पाकिस्तानची टिपली ६ फायटर जेट्स, ३० पेक्षा अधिक क्षेपणास्त्रे

भारताचे सिद्ध झाले वर्चस्व

भारताने चार दिवसांत पाकिस्तानची टिपली ६ फायटर जेट्स, ३० पेक्षा अधिक क्षेपणास्त्रे

भारतीय सेनादलांनी पाकिस्तानवर केलेल्या हल्ल्याची नवनवी माहिती आता समोर येत आहे. त्यानुसार भारताने पाकिस्तानचे कसे जबर नुकसान केले याची माहिती देणारे आकडे समोर आले आहेत. मागील महिन्यात झालेल्या चार दिवसांच्या संघर्षात भारतीय हवाई दलाने पाकिस्तानच्या हवाई दलाची मोठी हानी केली, अशी माहिती या मोहिमेत सहभागी असलेल्या वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे.

सूत्रांनी इंडिया टुडे ला सांगितले की, ऑपरेशनल डेटाच्या तांत्रिक विश्लेषणावरून स्पष्ट होते की, पाकिस्तानच्या हवाई दलाची सहा फायटर विमाने हवाई लढतीत पाडण्यात आली. त्याचबरोबर इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर अथवा एअरबोर्न अर्ली वॉर्निंग अँड कंट्रोल (AEW&C) प्रकारातील होते ते सुदर्शन’ क्षेपणास्त्र प्रणालीने सुमारे ३०० किमी अंतरावरून नेमका हल्ला करून पाडण्यात आले.

 

भोलारी एअरबेसवर मोठा हल्ला

स्वीडन निर्मित आणखी एक AEW विमान भोलारी हवाई तळावर हवेतून जमिनीवर मारा करणाऱ्या क्रूझ क्षेपणास्त्राने उद्ध्वस्त करण्यात आले. त्या वेळी हँगर्समध्ये इतर फायटर जेट्सही असल्याचे गुप्तचर माहितीत नमूद होते, मात्र पाकिस्तानने अद्याप तिथील ढिगारा साफ केला नसल्यामुळे हानीचे अधिकृत आकडे निश्चित नाहीत, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

 

सी-130 आणि ड्रोन हल्ले

पाकिस्तानच्या पंजाब भागात भारतीय ड्रोन स्ट्राइकमध्ये एक C-130 ट्रान्सपोर्ट विमानही नष्ट झाले. रडार आणि क्षेपणास्त्र संरक्षण प्रणालीने पाकिस्तानच्या फायटर जेट्सना लागलेला फटका टिपला आणि रडारवरून त्यांचे गायब होणे दृश्यमाध्यमांद्वारे स्पष्ट झाले.

हे ही वाचा:

कबुतरांना दाणा टाकण्याच्या प्रथेवर राष्ट्रीय हरित लवाद आक्रमक

सोन्याचा दर वाढला; ९७ हजारावर पोहोचले

ड्रॅगन बोट फेस्टिव्हलच्या सुट्ट्यांमध्ये ८२ लाख पर्यटकांची भेट

बिहारमध्ये सुशासनाची सरकार

 

चीनी बनावटीचे ड्रोन उद्ध्वस्त

राफेल आणि सुखोई-३० फायटर जेट्सच्या समन्वयित हल्ल्यात चीनी बनावटीचे ‘Wing Loong’ प्रकारचे मध्यम-उंचीवर उड्डाण करणारे, लांब पल्ल्याचे ड्रोनही नष्ट करण्यात आले. भारतीय वायूदलाच्या संरक्षण यंत्रणांनी १० हून अधिक लढाऊ ड्रोनही पाडले. पाकिस्तानकडून भारतीय हवाई तळांवर डझनावधी क्षेपणास्त्रे (क्रूझ आणि बॅलिस्टिक प्रकारची) डागण्यात आली होती, जी भारतीय हवाई दलाने रोखली.

 

ऑपरेशन सिंदूर’ची पार्श्वभूमी

हा संघर्ष ६-७ मेच्या रात्रीपासून सुरू झाला, जेव्हा भारताने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तान व पाकिस्तान-अधिकृत जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी पायाभूत सुविधांवर प्रत्युत्तरात्मक हल्ले सुरू केले. १० मे रोजी पाकिस्तानने युद्धबंदीची विनंती केल्यानंतर संघर्ष संपला. या कालावधीत भारतीय हवाई दलाने केलेल्या हल्ल्यांमध्ये पाकिस्तानला मोठे नुकसान सहन करावे लागले.

इतर महत्त्वाचे मुद्दे

भारताने या मोहिमेत एअर-लाँच्ड क्रूझ मिसाईल्स वापरल्या. ब्राह्मोस या जमिनीवरून डागण्यात आलेल्या क्षेपणास्त्रांचा वापर करण्यात आला नाही. मोठ्या प्रमाणात ऑपरेशनल डेटा गोळा करण्यात आला असून त्याचे विश्लेषण अद्याप सुरू आहे.

Exit mobile version