पाकिस्तानचे शस्त्रसंधीचे नाटक

भारताशी संपर्क साधून युद्धबंदीची तयारी दर्शविली

पाकिस्तानचे शस्त्रसंधीचे नाटक

भारताविरोधात सातत्याने ड्रोन हल्ले करणाऱ्या पाकिस्तानने शनिवारी गुडघे टेकल्याचे नाटक केले. शनिवारी दुपारी ३.३५च्या सुमारास भारताशी संपर्क साधून पाकिस्तानने शस्त्रसंधीची मागणी केली. त्याबद्दल परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांनी सविस्तर माहिती दिली.

शनिवारी पत्रकार परिषदेत बोलताना परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी म्हणाले की, “पाकिस्तानचे लष्करी ऑपरेशन्स महासंचालक (डीजीएमओ) यांनी आज दुपारी ३:३५ वाजता भारत आणि डीजीएमओ यांना फोन केला. दोन्ही बाजूंनी जमिनीवर, हवेत आणि समुद्रात सर्व गोळीबार आणि लष्करी कारवाई थांबवण्याचे मान्य करण्यात आले. यानंतर दोन्ही बाजूंना या समझोत्याला अंमलात आणण्यासाठी सूचना देण्यात आल्या आहेत. लष्करी ऑपरेशन्सचे महासंचालक १२ मे रोजी दुपारी १२ वाजता पुन्हा चर्चा करतील.”

परराष्ट्र मंत्री एस जयशंकर म्हणाले की, “भारत आणि पाकिस्तानने आज गोळीबार आणि लष्करी कारवाई थांबवण्याबाबत एक सामंजस्य करार केला आहे. भारताने सर्व प्रकारच्या दहशतवादाविरुद्ध सातत्याने ठाम आणि तडजोड न करणारी भूमिका कायम ठेवली आहे. पुढेही ही भूमिका अशीच असेल.”

हे ही वाचा..

…तर भारत पाकिस्तानच्या दहशतवादी हल्ल्यांना युद्ध मानणार! भारताचा अंतिम इशारा

बातम्या देताना हवाई हल्ला सायरनच्या आवाजाचा वापर करू नका!

पाकिस्तानी ड्रोनचा टार्गेट होते निष्पाप नागरिक

पाकिस्तानचे अण्वस्त्रहरण; अण्वस्त्राबाबत बैठक बोलावल्याचे वृत्त खोटे

पाकिस्तानचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री इशाक दार यांनीही युद्धबंदीची पुष्टी केली. “पाकिस्तान आणि भारत यांनी तात्काळ प्रभावीपणे युद्धबंदीवर सहमती दर्शविली आहे. पाकिस्तानने नेहमीच या प्रदेशात शांतता आणि सुरक्षिततेसाठी प्रयत्न केले आहेत, त्यांच्या सार्वभौमत्वाशी आणि प्रादेशिक अखंडतेशी तडजोड न करता,” असे त्यांनी म्हटले आहे.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये याची माहिती दिली असून ट्रम्प यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत दावा केला की, भारत आणि पाकिस्तान युद्धबंदीवर सहमत झाले आहेत.

पण पाकिस्तानची ही शस्त्रसंधीची विनंती त्यांनीच तीन तासाच मोडली आणि भारतावर हल्ले केले. अर्थात ते भारताने परतवून लावत चोख उत्तर दिले.

 

Exit mobile version