पंतप्रधान मोदी शांतिदुत, मित्र; मुलाखतकार फ्रिडमनने विरोधकांना खिजवले

पॉडकास्ट मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी लेक्स फ्रिडमन यांच्याकडून गौरवोद्गार

पंतप्रधान मोदी शांतिदुत, मित्र; मुलाखतकार फ्रिडमनने विरोधकांना खिजवले

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकन शास्त्रज्ञ लेक्स फ्रिडमन यांच्या पॉडकास्ट मुलाखतीत विविध जागतिक मुद्द्यांवर आणि काही वैयक्तिक जीवनावर आपले विचार मांडले. यावेळी लेक्स फ्रिडमन यांनी नरेंद्र मोदींची ओळख करून देताना नरेंद्र मोदी आणि जागतिक नेत्यांचे त्यांच्याशी असलेले संबंध आणि नरेंद्र मोदी यांचा जगभरात वाजत असलेला डंका याबद्दल कौतुक केले.

लेक्स फ्रिडमन म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जगभरातील सर्व मोठे नेते स्वागत करतात. नरेंद्र मोदी यांच्याकडे जगभरातील नेते शांतीदूत आणि एक मित्र म्हणून पाहतात. अगदी ज्या देशांमध्ये युद्ध सुरू आहे असे नेतेसुद्धा पंतप्रधान मोदींचा सन्मान करतात. अमेरिका, चीन, रशिया, युक्रेन, इस्रायल, पॅलेस्टाईन असो किंवा मध्य पूर्व देश असो पंतप्र्दाहन नरेंद्र मोदी यांचा सर्व ठिकाणी सन्मान केला जातो, असं लेक्स फ्रिडमन म्हणाले.

लेक्स फ्रिडमन पुढे म्हणाले की, “आज माणुसकी आणि मानवाचे भविष्य हे नाजूक वळणावर येऊन ठेपले आहे. काही ठिकाणी युद्धजन्य परिस्थिती आहे. हे युद्ध देशांमध्ये होऊन जगभरात पसरू शकते. आण्विक शक्ती असलेल्या देशांमध्ये तणाव वाढणे, एआय ते आण्विक क्षेत्रातील प्रगती असे बदलाव हे समाज आणि राजकारणाला पूर्णपणे बदलू शकतात. सांस्कृतिक उलटफेर होऊ शकतात. अशावेळी आपल्याला अत्यंत चांगल्या नेत्यांची आवश्यकता आहे. असे नेते जे शांतता आणतील, जगाला तोडणार नाहीत तर जोडतील. जे स्वतःच्या देशाच्या रक्षणासोबतचं संपूर्ण मानव जातीच्या भल्यासाठी विचार करण्याचा प्रयत्न करतील. एकूणच जगाच्या विचार करतील आणि यामुळेच पंतप्रधान मोदींसोबत झालेल्या गप्पा या आजपर्यंतच्या झालेल्या गप्पांपेक्षा वेगळ्या होत्या,” असे म्हणत त्यांनी नरेंद्र मोदींचे कौतुक केले.

हे ही वाचा : 

श्री कृष्णाने अर्जुनला दिलेल्या शिकवणीमधून दिवसभर उर्जा, शांती, समाधान मिळते

प्रभू राम जन्मभूमी ट्रस्टने गेल्या पाच वर्षात ४०० कोटींचा कर भरला!

वक्फ बोर्डची संपत्ती मुस्लिमांच्या पूर्वजांची

रामजन्मभूमी आंदोलनाला ८ वर्षे लागली, औरंग्याच्या कबरीसाठी पाहू किती वर्षे लागतात?

नरेंद्र मोदी यांनीही पॉडकास्ट मुलाखतीत विविध जागतिक मुद्द्यांवर आणि इतर जागतिक नेत्यांशी असलेल्या त्यांच्या संबंधांवर आपले विचार मांडले. यावेळी त्यांनी पाकिस्तानमधील दहशतवादावर भाष्य करत पाकिस्तानवर टीकाही केली. नरेंद्र मोदींनी ट्रम्प यांच्या अमेरिकेप्रती असलेल्या समर्पणाचे कौतुक केले. तर, युक्रेन आणि रशियामधील संवाद आणि वाटाघाटीद्वारेच युद्ध सोडवता येईल या भारताच्या भूमिकेचा त्यांनी पुनरुच्चार केला. भारत आणि चीनमधील संबंध मजबूत करण्याच्या महत्त्वावर त्यांनी भाष्य केले. दोन्ही राष्ट्रांमधील स्पर्धेमुळे संघर्ष होऊ नये आणि स्थिर आणि सहकार्यात्मक संबंध निर्माण करण्यासाठी संवाद आवश्यक आहे यावर पंतप्रधान मोदींनी भर दिला.

Exit mobile version