छत्रपती संभाजी महाराजांवर अत्याचार करणारा, हिंदू देवतांची मंदिरे नष्ट करणारा, हिंदू महिलांवर अत्याचार करणारा क्रूरकर्मा मुघल सम्राट औरंगजेब याच्या राज्यातील कबरीवरून राज्यभरात आंदोलने, निदर्शने केली जात आहेत. औरंगजेबाची कबर हटवण्यासाठी राज्यभरातील विविध हिंदू संघटना, भाजपाकडून मागणी केली जात आहेत. याच पार्श्वभूमीवर आज (१७ मार्च) राज्यभरात विश्व हिंदू परिषदेकडून आंदोलने करण्यात येत आहेत. औरंगजेबाची कबर लवकरात लवकर हटवावी अशी मागणी हिंदू संघटनेने केली आहे. विहिंपचे महाराष्ट्र-गोवा प्रांत मंत्री गोविंद शेंडे यांनी कबरीवरून मोठे वक्तव्य केले. राम जन्मभूमीच्या आंदोलनासाठी ८ वर्ष लागली, यासाठी आता किती वर्षे लागतील ते पाहू. ‘कबर हटवावीच लागेल नाहीतर आम्ही हटवू’, असे गोविंद शेंडे म्हणाले आहेत.
छत्रपती संभाजीनगर, पुणे, नागपूर, कोल्हापूर, मुंबई , नाशिक , जालना, जळगावसह राज्यातील अनेक जिल्ह्यात औरंगजेबाच्या कबरी विरोधात विश्व हिंदू परिषदेकडून आंदोलन करण्यात आले. हातात बॅनर घेवून ‘कबर हटाव’ अशा घोषणा देण्यात आल्या. आंदोलनात मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते सहभागी होते. याच पार्श्वभूमीवर औरंगजेबाच्या कबर परिसरात पोलीस बंदोबस्त देखील मोठ्या प्रमाणात ठेवण्यात आला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी योग्य ती खबरदारी प्रशासनाकडून घेण्यात येत आहे.
औरंगजेबाची कबर उचलून फेकणार असल्याचे विहिंपचे महाराष्ट्र-गोवा प्रांत मंत्री गोविंद शेंडे यांनी जाहीर केले. ते म्हणाले, प्रभू राम जन्मभूमी आंदोलनाच्या वेळेला आम्ही कारसेवा करण्याचे जाहीर केले होते आणि करून दाखवले. त्याच प्रमाणे आम्ही ‘चलो संभाजी नगर’चे आवाहन करू आणि थडगे हटवण्याचे काम करू.
हे ही वाचा :
उलटी झाल्याचे सांगत आरोपी पोलिसांच्या हातातून निसटला, पण…
औरंगजेबाच्या कबरीचे उदात्तीकरण कदापि होऊ देणार नाही!
ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींच्या पॉडकास्टला सोशल मीडियातून शेअर केले
ते पुढे म्हणाले, मोठ्या संख्येने कार्यकर्ते छत्रपती संभाजी नगरला जातील, मात्र त्याला थोडा वेळ लागेल. टप्प्या-टप्प्याने आंदोलन पुढे जाईल. आज शंखनाद केला आहे आणि हळूहळू हे आंदोलन पुढे जाईल, असे गोविंद शेंडे म्हणाले.