पाक पोलिसांचा नॅशनल प्रेस क्लबवर हल्ला; पत्रकारांना मारहाण

घटनेनंतर पाकिस्तानच्या मानवाधिकार आयोगाकडून निषेध व्यक्त

पाक पोलिसांचा नॅशनल प्रेस क्लबवर हल्ला; पत्रकारांना मारहाण

पाकव्याप्त काश्मीर म्हणजेच पीओकेमध्ये सध्या पाकिस्तान सरकारविरोधात निदर्शने सुरू आहेत. निदर्शकांवर पाक सैन्याने आणि पोलिसांनी केलेल्या गोळीबारानंतर १२ निदर्शकांना आपला प्राण गमवावा लागला. अशातच आता पाकिस्तानी पोलिसांनी इस्लामाबादमधील नॅशनल प्रेस क्लबवर हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण पाकिस्तानमध्ये तीव्र संताप निर्माण झाला असून गृहमंत्री मोहसिन नक्वी यांनी या घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

पीओकेमध्ये निदर्शनांचे नेतृत्व करणाऱ्या जम्मू काश्मीर जॉइंट अवामी अॅक्शन कमिटी (जेकेजेएएसी) च्या वकिलांचा एक गट शांततापूर्ण आंदोलन करत असताना पोलिसांनी हल्ला केला. वृत्तानुसार, पाकिस्तान सरकारने म्हटले आहे की, निदर्शकांची आणि पोलिसांची चकमक झाल्यानंतर त्यातील काही जण प्रेस क्लबमध्ये घुसले आणि ही घटना घडली. त्यानंतर पोलिसांनी प्रेस क्लबमध्ये लाठीचार्ज केला आणि यात पत्रकारांनाही सोडले नाही.

पाकिस्तानच्या मानवाधिकार आयोगाने (HRCP) पत्रकारांवरील हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे. तसेच या हिंसेसाठी जबाबदार असलेल्यांची त्वरित चौकशी व्हावी आणि कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. प्रख्यात पत्रकार जाहिद गिश्कोरी यांनीही अधिकाऱ्यांवर टीका केली आणि सर्व पत्रकार संघटनांना या घटनेचा एकत्रित निषेध करण्याचे आवाहन केले आहे. इस्लामाबाद प्रेस क्लबवर पोलिसांच्या क्रूर हल्ल्यामुळे गंभीर प्रश्न उपस्थित होतात. ज्यांना निषेध करण्यासाठी किंवा किमान आवाज उठवण्यासाठी जागा नाही त्यांच्यासाठी पत्रकारांचे घर कसे असुरक्षित झाले आहे? पत्रकार संघटनांनी आता एकत्र उभे राहिले पाहिजे, असे ते म्हणाले. संयुक्त राष्ट्रांमधील पाकिस्तानच्या माजी राजदूत मलीहा लोधी यांनीही या घटनेला निंदनीय म्हटले आहे.

हे ही वाचा : 
जागतिक वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप: मीराबाई चानूने रौप्यपदक जिंकले!
तालिबानचे परराष्ट्र मंत्री येणार भारत दौऱ्यावर
पंतप्रधान मोदींची ‘ही’ गोष्ट युरोपियन नेत्यांनी शिकावी! काय म्हणाले सेमीकंडक्टर कंपनीचे अधिकारी?
भारतावर लादलेल्या अतिरिक्त शुल्कावरून रशियाने अमेरिकेला सुनावले! काय म्हणाले पुतीन?
शुक्रवारी पीओकेमधील अशांतता पाचव्या दिवशी सुरू असताना ही घटना घडली. आतापर्यंत या हिंसक संघर्षात १२ जणांचा मृत्यू झाला आणि १५० हून अधिक जण जखमी झाले. तर, तीन पोलिस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. २९ सप्टेंबरपासून सुरू झालेले हे निदर्शने ३८ कलमी मागण्यांभोवती केंद्रित आहेत.
Exit mobile version