पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या बदला घेण्यासाठी भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवत पिओके आणि पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचे ९ स्थळ उध्वस्त केले. यानंतर, दहशतवादी हल्ले थांबवण्याबद्दल बोलण्याऐवजी पाकिस्तानने भारतावर हल्ले करण्यास सुरुवात केली. मात्र, पाकच्या हल्ल्याला भारतीय सैन्याने दिलेल्या जोरदार प्रत्युत्तरामुळे अखेर पाकला गुडघे टेकावे लागले. अखेर, पाकिस्तानने माघार घेतल्यानंतर, भारतानेही युद्धबंदी स्वीकारली. ही युद्धबंदी १० मे रोजी लागू झाली. दरम्यान, भारत-पाक युद्धात पाकिस्तानचा पराभव झाला हे संपूर्ण जगाला माहिती आहे. मात्र, हार होवून देखील हार मानेल तो पाकिस्तान कसला. कारण, १० मे रोजी झालेल्या युद्धबंदीचा दिवस हा पाकिस्तान आता दरवर्षी साजरा करणार आहे.
‘मरका-ए-हक’ (सत्याची लढाई) म्हणून पाक हा दिवस दरवर्षी साजरा करणार आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी स्वतः याची घोषणा केली. ते म्हणाले की, २२ एप्रिल ते १० मे पर्यंत जे घडले ते पाकिस्तानच्या संरक्षण इतिहासातील एक गौरवशाली अध्याय असेल. बरं, हे गौरवशाली आहे की लज्जास्पद आहे हा देखील एक प्रश्न आहे. २२ एप्रिल रोजी, पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये निष्पाप पर्यटकांवर हल्ला केला आणि शाहबाज शरीफ त्यांच्या संरक्षण इतिहासाच्या एका गौरवशाली अध्यायात ती तारीख समाविष्ट करत आहेत.
एकीकडे पाकिस्तान चांगला लढा दिल्याचा दावा करत आहे पण दुसरीकडे त्यांनी आज मान्य केले आहे की त्यांच्या बाजूने ११ सैनिकांसह ५१ लोक मारले गेले आहेत. त्याच वेळी, भारतीय लष्कराचे म्हणणे आहे की ६-७ मे च्या रात्री केलेल्या हवाई हल्ल्यात सुमारे १०० दहशतवादी मारले गेलेत. तसेच या कारवाईत ८० पाक सैनिकांचा मृत्यू झाल्याचा दावा भारताने केला आहे. दरम्यान, पाकिस्तानने खरी आकडेवारी लपविली असली तरी देखील ती आज ना उद्या समोर येईल अशी सर्वांना आशा आहे.
हे ही वाचा :
भारताचे उद्योग क्षेत्र ३ ट्रिलियन डॉलर संधी निर्माण करणार
आदमपूर एअरबेसला भेट देत पाकिस्तानचा ‘तो’ दावा मोदींनी ठरवला फोल
‘मोदी अंकल’ तुम्ही माझे हिरो आहात!
सीबीएसई : १० वी निकालात ९३.६६ टक्के विद्यार्थी यशस्वी
एवढेच नाही तर अनेक लष्करी अधिकारी एका दहशतवाद्याच्या अंत्यसंस्कारातही सहभागी झाले होते. तथापि, जेव्हा यावर प्रश्न उपस्थित केले गेले तेव्हा पाकिस्तान ते नाकारत राहिला, परंतु जेव्हा त्याची ओळख देखील उघड झाली तेव्हा त्याने आपला चेहरा लपवला. दरम्यान, पाकिस्ताने आता पूर्ण धाडसाने दरवर्षी १० मे रोजी ‘मरका-ए-हक’ साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.
