दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये वाढलेला तणाव आता कमी झाला आहे. दोनही देशांमध्ये युद्धबंदी झाली असून सध्या तरी शांततेचे वातावरण आहे. भारताने पाकिस्तानविरुद्ध केलेल्या कारवाईनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय सैन्याचे देशवासीयांच्या मनातून आभार व्यक्त होत आहेत. याच दरम्यान, दिल्लीच्या ऐतिहासिक जामा मशिदीचे नायब शाही इमाम सय्यद शबान बुखारी यांचा ७ वर्षांचा मुलगा आणि शाही इमाम सय्यद अहमद बुखारी यांचा नातू सय्यद अरीब बुखारी याने एक भावनिक संदेश दिला, जो हृदयस्पर्शी आहे.
व्हिडिओमध्ये अरीबने पंतप्रधान नरेंद्र मोदींना “मोदी अंकल” असे संबोधले आहे. व्हिडिओमध्ये पंतप्रधान मोदींना उद्देशून तो म्हणाला, “तुम्ही दहशतवादाविरुद्ध कठोर पाऊल उचलले आहे आणि ते तुम्ही कृतीतून दाखवून दिले आहे. ‘तुम्ही माझे हिरो’ आहात. मी खूप अस्वस्थ आणि घाबरलो होतो, पण आता मला शांत आणि तणावमुक्त वाटते. आता मी पुन्हा माझ्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करू शकतो. भारत सरकार आणि आमच्या शूर सैनिकांचे आभार, जय हिंद.”
हे ही वाचा :
परिणीती चोप्रा संतापल्या, काय म्हणाल्या ?
पंतप्रधानांनी जवानांचे मनोबल वाढवले
सीबीएसई : १० वी निकालात ९३.६६ टक्के विद्यार्थी यशस्वी
निवडणूक जिंकण्यासाठी पहलगामचा हल्ला? केरळ विद्यापीठातील परिसंवाद रद्द
या भावनिक संदेशासोबत, अरीबने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक प्रभावी कॅप्शन देखील लिहिले “मी घाबरलो होतो. आता मला सुरक्षित वाटते. ”मोदी अंकल आणि आपल्या शूर सैनिकांचे आभार, जय हिंद.” दरम्यान, हा व्हिडिओ समोर येताच सोशल मीडियावर त्याचे कौतुक होऊ लागले आहे. अनेक वापरकर्त्यांनी याला “राष्ट्राच्या आत्म्याचा खरा आवाज” म्हटले. काही लोक म्हणाले की “असे प्रेम द्वेषाच्या युगात आशा देते”.
