पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी पंजाबमधील आदमपूर एअरबेसला अचानक भेट दिली. या भेटीचे वेगळे महत्त्व होते ते म्हणजे पंतप्रधान मोदींच्या मागे MiG-29 फायटर विमान आणि S-400 एअर डिफेन्स सिस्टम स्पष्टपणे दिसते आहे. पाकिस्तानने असा दावा केला होता की, आदमपूरमधील भारताची S-400 ही सिस्टीम उद्ध्वस्त करण्यात आली. मात्र मोदीं तिथे पोहोचले तेव्हा त्यांच्या मागे ही यंत्रणा उभी असल्याचे दिसते. त्यावरून पाकचा दावा खोटा असल्याचे स्पष्ट झाले.
पाकिस्तानने म्हटले होते की, त्यांच्या JF-17 फायटर विमानाने आदमपूरच्या S-400 प्रणालीवर हल्ला करून ती नष्ट केली होती. प्रत्यक्षात, छायाचित्र आणि पंतप्रधानांची भेट या दोन्ही गोष्टी या दाव्यांना खोटं ठरवतात.
या भेटीमुशे पाकिस्तानचा बनाव उघड झाला. तसेच राष्ट्रीय सुरक्षेबाबत पंतप्रधान मोदींची कटिबद्धता पुन्हा अधोरेखित झाली.
या दौऱ्यात पंतप्रधानांनी हवाई दलाच्या जवानांशी संवाद साधला. आदमपूर हे भारताचे दुसरे सर्वात मोठे हवाई तळ असून अलीकडील संघर्षात पाकिस्तानने येथे ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्याचा प्रयत्न केला होता. मोदींनी या दौऱ्यासंदर्भात ट्विट केले की, “हे धाडस, निर्धार आणि निस्सीमता यांचे मूर्तिमंत प्रतीक असलेल्या जवानांसोबत असणे हा एक विशेष अनुभव होता. भारत आपल्या सैन्याचे सदैव ऋणी आहे.”
पाकिस्तानचा खोटारडेपणा उघड
पाकिस्तानने एक बनावट उपग्रह छायाचित्र प्रसिद्ध करत दावा केला की, आदमपूरमधील S-400 प्रणाली नष्ट झाली आहे. पण त्या छायाचित्रात कोणतेही स्फोटाचे खुणा, मलबा वा नुकसान स्पष्ट दिसत नव्हते. पण मोदींच्या भेटीतून आणि त्यांच्याद्वारे पोस्ट केलेल्या प्रत्यक्ष छायाचित्रांमधून हे स्पष्ट झाले की आदमपूर एअरबेसवर कोणतेही नुकसान झालेले नाही. रनवे आणि हवाई संरक्षण प्रणाली सुस्थितीत आहेत.
हे ही वाचा:
‘मोदी अंकल’ तुम्ही माझे हिरो आहात!
भारत संरक्षण तंत्रज्ञानात खूप पुढे
पाकिस्तानने फक्त ट्रेलर पहिला…
बिग बींनी जवानांमध्ये कसा भरला जोश
ही भेट “ऑपरेशन सिंदूर”नंतर झाली आहे, ज्यामध्ये भारताने दहशतवाद्यांच्या छावण्यांवर आणि पाकिस्तानातील सैनिकी ठिकाणांवर लक्ष केंद्रित केले होते. यानंतर पाकिस्तानने दहशतवाद्यांचे समर्थन करणारा प्रचार चालवला, जो या भेटीमुळे फोल ठरला.
केंद्रीय मंत्री बंडी संजय कुमार यांनी ट्विट केले:
“पंतप्रधान मोदी आदमपूर एअरबेसवर चालत जाताना दिसत आहेत. इथेच पाकिस्तानने खोटा दावा केला होता की ‘भारताचे नुकसान झाले आहे, पण हे वास्तव खोट्या प्रचारावर मात करते हे स्पष्ट झाले.”
आदमपूर एअरबेसचे महत्त्व
-
१९६५ च्या भारत-पाक युद्धात आदमपूर एक महत्त्वाचे टार्गेट होते, परंतु पाकिस्तानला हे भेदता आले नव्हते.
-
सध्या येथे MiG-29 आणि Su-30 MKI सारख्या प्रगत फायटर स्क्वॉड्रन्स आहेत.
-
२०२२ मध्ये पहिला S-400 युनिट येथेच तैनात करण्यात आला.
-
पंजाब, जम्मू-कश्मीर आणि राजस्थानसारख्या सीमावर्ती राज्यांचे संरक्षण याच ठिकाणावरून होते.
