भारत-मंगोलिया राजनैतिक संबंधांच्या ७० व्या वर्धापन दिनानिमित्त सांस्कृतिक वारसा साजरा

पंतप्रधान मोदी आणि मंगोलियाचे अध्यक्ष उखना यांनी संयुक्त टपाल तिकिट जारी केले

भारत-मंगोलिया राजनैतिक संबंधांच्या ७० व्या वर्धापन दिनानिमित्त सांस्कृतिक वारसा साजरा

भारत आणि मंगोलिया यांच्यातील राजनैतिक संबंधांच्या ७० व्या वर्धापन दिनानिमित्त दोन्ही देशांमध्ये असलेल्या सखोल सांस्कृतिक आणि ऐतिहासिक संबंधांचा गौरव करण्यात आला. यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मंगोलियाचे अध्यक्ष खुरेलसुख उखना यांनी मंगळवारी (१४ ऑक्टोबर) संयुक्तपणे एक स्मारक टपाल तिकिट जारी केले.

या विशेष टपाल तिकिटावर भारताची पारंपरिक रामलीला आणि मंगोलियाचे प्रसिद्ध बियेलगी लोकनृत्य यांचे चित्रण आहे. हे तिकिट दोन्ही देशांच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे आणि सामायिक परंपरांचे प्रतीक मानले जात आहे.

मंगोलियाचे अध्यक्ष उखना सध्या चार दिवसांच्या भारतदौऱ्यावर असून, मंगळवारी पंतप्रधान मोदींशी त्यांनी विस्तृत चर्चा केली. या भेटीदरम्यान द्विपक्षीय संबंध, सांस्कृतिक सहयोग, आणि बौद्ध तत्त्वज्ञानाशी संबंधित मुद्द्यांवर विशेष भर देण्यात आला.

हे ही वाचा :

जैसलमेर बसला लागलेल्या आगीत २१ जणांचा मृत्यू; पंतप्रधानांकडून मृतांना शोक व्यक्त!

दिवंगत आयपीएस अधिकाऱ्याच्या पत्नीला अटक झाल्यानंतरच अंत्यसंस्कार करू!

गोपनीय कागदपत्रे बाळगल्याप्रकरणी अटकेत असलेले एशले टेलिस कोण आहेत?

ईडीच्या छाप्यात १.५ लाख डॉलर्सची क्रिप्टोकरन्सी जप्त

पंतप्रधान मोदी यांनी आपल्या वक्तव्यात म्हटले, “भारत-मंगोलिया संबंध केवळ राजनैतिक नाहीत, तर ते आध्यात्मिक बंधनांनी गुंफलेले आहेत. शतकानुशतके दोन्ही देश बौद्ध धर्माच्या तत्त्वांनी बांधलेले आहेत, म्हणूनच आपल्याला आध्यात्मिक भावंडे देखील म्हटले जाते.” या ऐतिहासिक प्रसंगाने भारत-मंगोलिया मैत्रीला नवसंजीवनी दिली असून, भविष्यातील सांस्कृतिक, आध्यात्मिक आणि धोरणात्मक सहकार्याचे नवे क्षितिज उघडले आहे.

Exit mobile version