अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी (३० जुलै) भारतावर २५ टक्के कर लागू करण्याची घोषणा केली होती, जी १ ऑगस्टपासून म्हणजेच आजपासून लागू होणार होती. पण आता ती एका आठवड्यासाठी पुढे ढकलण्यात आली आहे. अमेरिकेने जारी केलेल्या नवीन सूचनांमध्ये, हा कर आता ७ दिवसांनंतर बांगलादेश, ब्राझील आणि भारतासह इतर देशांवर लागू केला जाईल, जो ७ ऑगस्ट २०२५ पासून लागू होईल.
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतासह अनेक देशांवर अचानक शुल्क जाहीर करून जगात पुन्हा एकदा खळबळ उडवून दिली होती. भारतावर २५ टक्के शुल्काची घोषणा करताना ट्रम्प म्हणाले की, व्यापारातील अडथळे दूर करण्यासाठी हा शुल्क लादण्यात येत आहे. याशिवाय, रशियाकडून तेल आणि संरक्षण उत्पादने खरेदी केल्यामुळे दंडही जाहीर करण्यात आला होता. तथापि, नवीन आदेशानुसार, अमेरिकेने सर्व देशांवरील शुल्क १ आठवड्यासाठी पुढे ढकलले आहे, म्हणजेच शुल्क लागू करण्याची नवीन अंतिम मुदत आता ७ ऑगस्ट आहे.
हे ही वाचा :
Ind vs Eng 5th Test: ओव्हल येथे पहिल्या दिवशी भारताच्या खराब सुरुवात
झीशान सिद्दीकी धमकी प्रकरणात “डी कंपनी” कनेक्शन?
अमेरिकेचे भारतासह ७० पेक्षा अधिक देशांवर नवीन टॅरिफ
रायगडात ३५ मोबाईलसह ६१७५ सिमकार्ड जप्त, ११ आरोपींना अटक
दरम्यान, एका सरकारी अधिकाऱ्याने म्हटले की भारत या शुल्काचा बदला घेणार नाही आणि वाटाघाटीच्या टेबलावर या विषयावर चर्चा करण्यास आणि दोन्ही पक्षांच्या हितासाठी उपाय शोधण्यास तयार आहे. लोकसभेत बोलताना केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी असेही सांगितले की चर्चा १० ते १५ टक्के कर बद्दल होती. त्यांनी सांगितले होते की कर बाबत राष्ट्रीय हितासाठी सर्व शक्य पावले उचलली जातील.
