“नेहमी नकारात्मक का असता?” ट्रम्प यांचा नेतन्याहू यांना प्रश्न; नेमकं काय घडलं?

ट्रम्प यांच्या गाझा शांतता प्रस्तावातील काही मुद्द्यांना हमासची सहमती

“नेहमी नकारात्मक का असता?” ट्रम्प यांचा नेतन्याहू यांना प्रश्न; नेमकं काय घडलं?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेल्या शांततेच्या प्रस्तावावर हमासने सकारात्मकता दाखवल्यानंतर गाझा पट्टीत शांतता प्रस्थापित होण्याची शक्यता आहे. अशातच डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांना त्यांचे नकारात्मक वागणे थांबवण्याचा सल्ला दिला आहे.

ट्रम्प यांच्या गाझा शांतता प्रस्तावाला हमासने सहमती दिल्यानंतर त्यांनी इस्रायली पंतप्रधानांना फोन करून ही चांगली बातमी दिली. पण, नेतन्याहू यांनी ट्रम्प यांना सांगितले की, या विकासाबद्दल साजरा करण्यासारखे काहीही नाही आणि याचा फार काहीही अर्थ नाही. यावर ट्रम्प यांनी प्रत्युत्तर दिले की, “तुम्ही नेहमीच इतके नकारात्मक का असता हे मला कळत नाही. हा एक विजय आहे. ते समजून घ्या,” असे वृत्त अमेरिकन अधिकाऱ्यांच्या हवाल्याने समोर आले आहे. दरम्यान, ट्रम्प यांना अशी चिंता होती की, हमास त्यांची योजना पूर्णपणे नाकारेल. पण, काही अंशी प्रस्ताव हमासने स्वीकारला त्यामुळे इस्रायली पंतप्रधानांच्या सौम्य प्रतिक्रियेवर ट्रम्प यांची तीव्र प्रतिक्रिया निर्माण झाली.

नेतान्याहू यांच्याशी झालेल्या संभाषणानंतर लगेचच, ट्रम्प यांनी एक निवेदन जारी करून इस्रायलला गाझावरील हवाई हल्ले थांबवण्यास सांगितले. तीन तासांनंतर, नेतान्याहू यांनी आदेश दिला. पुढे ट्रम्प यांनी सांगितले की, गाझामध्ये शांतता कराराच्या आम्ही जवळ आलो आहोत, जो येत्या काही दिवसांत अंतिम करण्यासाठी प्रयत्न केले जातील.

हेही वाचा :

बंगालमधील पूरग्रस्तांना भेट देत असताना भाजपा खासदारावर हल्ला!

‘न्यू बॉल स्टार’ क्रांती गोड — पाकिस्तानविरुद्ध घडवला इतिहास!

Women Worldcup 2025: पाकिस्तानविरुद्ध विजयानंतर हरमनप्रीत म्हणाली – खेळपट्टी फलंदाजीसाठी कठीण होती

सोनम वांगचुक अटक प्रकरणात दिलासा नाही; सुनावणी पुढे ढकलली!

सोमवारी इजिप्तमध्ये हमास, इस्रायल आणि अमेरिकेचे प्रतिनिधी एकत्र येऊन चर्चेत सहभागी होणार आहेत. अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी वाटाघाटी करणाऱ्यांना गाझामधील जवळजवळ दोन वर्षांचे युद्ध संपवण्यासाठी आणि इस्रायली तुरुंगात बंदिवानांच्या बदल्यात गाझामधील बंदिवानांची सुटका करण्यासाठी वेगाने पुढे जाण्याचे आवाहन केले आहे.

Exit mobile version