महिला विश्वचषकात भारताने पुन्हा एकदा पाकिस्तानला पराभूत करत दमदार सुरुवात कायम ठेवली आहे. या हाय-व्होल्टेज सामन्यात चमकली मध्य प्रदेशातील घुवारा गावची तरुणी — क्रांती गोड!
केवळ २२ वर्षांच्या क्रांतीनं पाकिस्तानविरुद्ध १० षटकांत ४७ डॉट बॉल्स टाकत ३ बळी घेतले आणि ‘न्यू बॉल स्टार’ ठरली. २०२० नंतरच्या महिला वनडेमध्ये भारतीय वेगवान गोलंदाजीकडून सर्वाधिक डॉट बॉल्सचा हा नवा विक्रम आहे.
क्रांतीच्या साथीला रेणुका सिंहनं ४५ डॉट बॉल्स टाकले. दोघींनी मिळून तब्बल ९२ डॉट बॉल्स टाकत पाकिस्तानचा श्वास रोखला!
गावकऱ्यांनी मोठ्या स्क्रीनवर सामना पाहत आपल्या ‘क्रांती’च्या पराक्रमाचा जल्लोष केला. क्रांतीने आतापर्यंत ९ वनडे सामन्यांत १८ विकेट्स घेतल्या असून ती टी-२०मध्येही पदार्पण करून झाली आहे.
हेही वाचा:
बंगालमधील पूरग्रस्तांना भेट देत असताना भाजपा खासदारावर हल्ला!
भारत जागतिक दूरसंचार केंद्र म्हणून उदयास येणार
सोनम वांगचुक अटक प्रकरणात दिलासा नाही; सुनावणी पुढे ढकलली!
यंदा काश्मीर खोऱ्यात हिवाळ्याचे लवकर आगमन पहा व्हिडिओ
भारताने प्रथम फलंदाजी करत २४७ धावा केल्या, तर पाकिस्तानचा डाव सिद्रा अमीनच्या (८१) खेळीनंतरही १५९ धावांवर आटोपला.
दीप्ती शर्मासह क्रांती गोड भारताच्या विजयाची खऱ्या अर्थाने ‘हीरो ऑफ द मॅच’ ठरली. भारताचा पुढील सामना ९ ऑक्टोबर रोजी विशाखापट्टणममध्ये साउथ आफ्रिकेविरुद्ध होणार आहे.







