31.1 C
Mumbai
Tuesday, June 2, 2026
घरक्राईमनामागुजरातमध्ये सुरू होता एमडी ड्रग्जचा कारखाना

गुजरातमध्ये सुरू होता एमडी ड्रग्जचा कारखाना

साकीनाका पोलिसांकडून ७५ कोटींचे ड्रग्ज जप्त

Google News Follow

Related

मुंबईत अमली पदार्थांचा पुरवठा करणाऱ्या टोळ्यांविरोधात साकीनाका पोलिसांनी मोठी धडक कारवाई केली आहे. गुजरात राज्यातील नर्मदा जिल्ह्यातील एका घरात चोरून सुरू असलेला मेफेड्रोन (एमडी) या अमली पदार्थाचा कारखाना साकीनाका पोलिसांनी उद्ध्वस्त केला आहे. या कारवाईत पोलिसांनी ७४.४६ कोटी रुपये आंतरराष्ट्रीय बाजारमूल्याचे २० किलोहून अधिक लिक्विड एमडी आणि इतर रासायनिक साहित्यासह एकूण ७४.९७ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे.
साकीनाका पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाला २१ मे २०२६ रोजी माहिती मिळाली होती की, अंधेरी-घाटकोपर लिंकरोडवरील पेनिन्सुला हॉटेलसमोर एक महिला अमली पदार्थ विक्रीसाठी येणार आहे. त्यानुसार सापळा रचून पोलिसांनी मुस्कान समीर खान (२६) या महिलेला १०१ ग्रॅम एमडीसह ताब्यात घेतले. तिची कसून चौकशी केली असता, तिने हे ड्रग्ज मुंब्रा येथील वडाल कमर अबुल वफा चौधरी उर्फ पप्पु (५६) याच्याकडून घेतल्याचे निष्पन्न झाले.
हे ही वाचा:
गुजरातमध्ये महाराष्ट्रातल्या बस धडकल्या, ७ जणांचा जळून मृत्यू

गुगल पेस्ट कंट्रोलच्या धंद्यात उतरण्याच्या तयारीत…

सीबीएसई घोटाळा प्रकरणी अध्यक्ष आणि सचिवाला हटवले

आयपीएल २०२६ गाजवणारे ५ परदेशी सुपरस्टार
साकीनाका पोलिसांनी २६ मे रोजी मुंब्रा येथील शिळफाटा परिसरातून पप्पुला ताब्यात घेतले. त्याने केलेल्या चौकशीत गुजरातमध्ये एमडी बनवण्याचा कारखाना असल्याचे समोर आले. या माहितीच्या आधारे साकीनाका पोलिसांचे विशेष पथक थेट गुजरातच्या नर्मदा जिल्ह्यातील नांदोद तालुक्यातील वरखड गावात धडकले. तेथील एका घरात भाड्याने राहून हा गोरखधंदा चालवला जात असल्याचे पोलिसांना आढळले. पोलिसांनी छापा टाकून मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ निर्मितीचे साहित्य जप्त केले.
या कारवाईत पोलिसांनी २०.०४० किलो लिक्विड एमडी (किंमत ७४.४६ कोटी), २६ किलो २-ब्रोमो-४-मिथाइलएनिलिन, ५० लिटर ४-मिथाइलप्रोपियोफेनोन, २० लिटर मोनोमिथाइलअमाइन, १३.५० लिटर ब्रोमिन आणि ३५ लिटर क्लोरोफॉर्म यांसारखी घातक रसायने जप्त केली आहेत. याशिवाय स्टेरर मशीन, दोन कमर्शिअल फ्रीज आणि हीटिंग मेटल अशी उपकरणेही हस्तगत केली आहेत.
ही कारवाई मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती, सहआयुक्त (कायदा व सुव्यवस्था) मनोज कुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त अभिनव देशमुख आणि पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली साकीनाका पोलिसांच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
310,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा