गुजरातच्या सुरतमधील कठपुतळी कलाकार राजू भट याने तुटलेल्या दगडावर संगीत तयार करत हृदयस्पर्शी गीत सादर केल्यानंतर संपूर्ण देशाचे लक्ष वेधले आहे. केवळ काही दिवसांतच त्याच्या एका व्हिडिओला तब्बल 146 दशलक्षाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.
सामान्यतः व्यावसायिक वाद्यांवर गाणं सादर केल्यावरच कलाकारांना प्रसिद्धी मिळते, पण राजूने हे सगळं खोडून काढलं आहे. त्याचे गाणं आणि त्याचा साधेपणाचा अंदाज सोशल मीडियावर तुफान गाजतो आहे. रांदेर परिसरात राहणारा आणि कठपुतळी कार्यक्रमांमध्ये ढोल वाजवणारा राजू अचानकच देशभरात चर्चेचा विषय ठरला आहे.
सुरूवात एका वेदनेतून
“हृदय तुटले आणि दगड झाला साथीदार” हे गाणं गाण्यामागे एक भावनिक प्रसंग आहे. राजूने सांगितलं की, एकदा तो मित्राला भेटायला गेला असताना मन खिन्न होतं. वाद्य नव्हतं, पण भावनांना वाट करून देण्यासाठी त्याने जवळच पडलेला दगड उचलला आणि गाणं म्हणायला सुरुवात केली. त्याचा हा नैसर्गिक पल मित्राने शूट केला, इंस्टाग्रामवर टाकला, आणि मग सुरू झाला त्याचा व्हायरल प्रवास.
गुजरात सूरत के रहने वाला राजू के पास तो कला है
मधुर आवाज़ है
आजकल इंस्टाग्राम पर छाये हुए है
ग़रीबी के अंदर जीने वाले राजू को भी सही सम्मान मिलना चाहिए ❤️🙏 pic.twitter.com/rs4HHy3rIV— Nunu (@Dreams_realites) June 30, 2025
प्रेरणा ट्रेनमधून
राजूने खुलासा केला की त्याने ही अनोखी कला एका ट्रेनमध्ये पाहिलेल्या मुलाकडून शिकली. फक्त १५ दिवसांत त्याने दगडांचा आवाज आणि त्यावरील संगीत आत्मसात केलं. त्यावेळी त्याला याचा कधी अंदाजही नव्हता की ही कला त्याला प्रसिद्धीच्या शिखरावर नेईल.लोकांच्या प्रेमाने घडलेला कलाकार
कधीकाळी अनोळखी असलेला राजू आज देशभरात ओळखला जातो. त्याचा इंस्टाग्राम आयडी ‘राजू कलाकार’ आता 1 लाख 2 हजारांहून अधिक फॉलोअर्सने गजबजलेला आहे. ही कहाणी अधोरेखित करते की कलेची सीमा नसते आणि अनोख्या परिस्थितीतच असामान्य प्रतिभा उगम पावते.
