रेखा गुप्ता यांच्यासोबत आणखी सहा नेते घेणार मंत्री पदाची शपथ

तब्बल २७ वर्षांनंतर दिल्लीत भाजपाची सत्ता; मुख्यमंत्री पदासाठी दिला महिला चेहरा

रेखा गुप्ता यांच्यासोबत आणखी सहा नेते घेणार मंत्री पदाची शपथ

दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपाने बहुमतासह यश मिळवले असून आता सरकार स्थापन करण्यासाठी भाजपाकडून रेखा गुप्ता यांचे नाव देण्यात आले आहे. तब्बल २७ वर्षांनंतर दिल्लीत भाजपाची सत्ता आली असून भाजपाने मुख्यमंत्री पदासाठी महिला चेहरा दिला आहे. रेखा गुप्ता यांचा शपथविधी सोहळा आज पार पडणार असून यासोबतच आणखी सहा भाजपा नेते कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेणार आहेत.

शपथविधी सोहळ्यात मंत्री म्हणून शपथ घेणाऱ्या इतर मंत्र्यांमध्ये परवेश साहिब सिंग, आशिष सूद, मनजिंदर सिंग सिरसा, रविंदर इंद्रराज सिंग, कपिल मिश्रा आणि पंकज कुमार सिंग यांचा समावेश आहे. अधिकृत अधिसूचनेत या नावांची पुष्टी करण्यात आली आहे.

अनेक दिवस भाजपाकडून दिल्लीच्या मुख्यमंत्री पदी बसणाऱ्या व्यक्तीचे नाव गुलदस्त्यात ठेवण्यात आले होते. अखेर बुधवार, १९ फेब्रुवारी रोजी भाजपाने रेखा गुप्ता यांच्या नावाची घोषणा केली. त्यांचा शपथविधी समारंभ आज रामलीला मैदानावर होणार आहे. विशेष म्हणजे, दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदासाठी भाजपच्या पसंती म्हणून परवेश वर्मा यांचे नाव चर्चेत होते. राजधानीत भाजपचा चेहरा असलेल्या परवेश सिंग यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीत नवी दिल्ली मतदारसंघातून अरविंद केजरीवाल यांचा पराभव केला होता. मात्र, भाजपाने रेखा गुप्ता यांचे नाव जाहीर केले आहे. याशिवाय कपिल मिश्रा, आशिष सूद, पंकज सिंग, रवींद्र राज आणि मनजिंदर सिंग सिरसा यांनीही अनुक्रमे करावल नगर, जनकपुरी, विकासपुरी, बवाना आणि राजौरी गार्डन या जागांवर विजय मिळवला आहे.

हे ही वाचा:

राहुलबाबा तुम्हाला छत्रपतींचे नाव पेलवणार नाही?

कारवार नौदल तळाची माहिती लीक करणाऱ्या दोघांना ठोकल्या बेड्या

पाच राज्यांना १५५४.९९ कोटींचा राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधी मंजूर

छत्रपती शिवरायांचे किल्ले कोणत्याही मंदिरापेक्षा मोठे!

रेखा गुप्ता यांनी मुख्यमंत्री पदाची सूत्रे हाती घेताच त्या सुषमा स्वराज, शीला दीक्षित आणि आतिशी यांच्यानंतर दिल्लीत पदभार स्वीकारणाऱ्या चौथ्या महिला मुख्यमंत्री असतील. त्यांनी शालीमार बाग मतदारसंघातून आपच्या बंदना कुमारी आणि काँग्रेसच्या परवीन कुमार जैन यांच्याविरुद्ध २९,५९५ मतांनी विजय मिळवला आहे. रेखा गुप्ता यांनी दिल्लीतील भाजपा महिला मोर्चाच्या सरचिटणीस आणि त्यांच्या राष्ट्रीय कार्यकारी समितीच्या सदस्या म्हणून काम केले आहे. या भूमिकांमध्ये, त्यांनी उपेक्षित समुदाय आणि महिलांच्या कल्याणासाठी अनेक मोहिमा सुरू केल्या आहेत. रेखा गुप्ता यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्ष नेतृत्वाचे त्यांच्यात स्थान दिल्याबद्दल आभार मानले तसेच अपेक्षा पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे.

Exit mobile version