केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय समितीने २०२४ मध्ये आलेल्या पूर, भूस्खलन, चक्रीवादळामुळे बाधित झालेल्या पाच राज्यांना राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधी (एनडीआरएफ) देण्याला मंजुरी दिली आहे. या अंतर्गत १५५४.९९ कोटी रुपयांच्या अतिरिक्त केंद्रीय मदतीला मंजुरी देण्यात आल्याचे गृह मंत्रालयाने म्हटले आहे.
गृहमंत्रालयाच्या या निर्णयामुळे आपत्तीग्रस्त राज्यांना दिलासा मिळाला आहे. गृह मंत्रालयाने मंजूर केलेल्या एकूण १५५४.९९ कोटी रुपयांपैकी आंध्र प्रदेशसाठी ६०८.०८ कोटी रुपये, नागालँडसाठी १७०.९९ कोटी रुपये, ओडिशासाठी २५५.२४ कोटी रुपये, तेलंगणासाठी २३१.७५ कोटी रुपये आणि त्रिपुरासाठी २८८.९३ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
दरम्यान, अमित शहा यांनी मंगळवारी आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यांची भेट घेत गुवाहाटी येथे होणाऱ्या आगामी दोन दिवसांच्या मेगा बिझनेस समिटला यशस्वी करण्यासाठी आणि देशाबाहेरील सहभागाच्या दृष्टीने महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये गुंतवणूक होण्याची अपेक्षा असलेल्या विविध उपाययोजनांबद्दल माहिती दिली. तसेच शिखर परिषदेला भरघोस यश मिळवून देण्याच्या प्रयत्नांचे कौतुक केले. या मेगा इव्हेंटमुळे केवळ मोठी गुंतवणूकच होणार नाही तर आसामला भारताचे विकास इंजिन आणि गुंतवणुकीसाठी आकर्षक ठिकाण म्हणून जागतिक नकाशावर स्थान मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.
हे ही वाचा :
भारताच्या पंतप्रधानांबद्दल खूप आदर, पण अमेरिका भारताला मतदानासाठी पैसे का देतोय?
छत्रपती शिवरायांचे किल्ले कोणत्याही मंदिरापेक्षा मोठे!
काँग्रेसशासित हिमाचलमध्ये मशिदीसमोर उभारलेल्या महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याला विरोध
छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त राजा, महाराजा, राजपुरूष नाहीत, तर आराध्य देव आहेत!
दोन दिवसांच्या ऍडव्हांटेज आसाम २.० शिखर परिषदेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी हे २५ फेब्रुवारी रोजी करणार आहेत. ऍडव्हांटेज आसाम २.० गुंतवणूकदार शिखर परिषदेदरम्यान आसाम सरकार जपान आणि सिंगापूरसोबत दोन सामंजस्य करारांवर (एमओयू) स्वाक्षरी करणार आहे, असे हिमंता बिस्वा सर्मा यांनी शनिवारी सांगितले.