छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना अभिवादन केले असून त्यांना आदरांजली वाहणारा एक व्हिडीओ शेअर केला आहे. नरेंद्र मोदी म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाने आणि दूरदर्शी नेतृत्वाने स्वराज्याची पायाभरणी केली, ज्यामुळे अनेक पिढ्यांना धैर्य आणि न्यायाची मूल्ये जपण्याची प्रेरणा मिळाली. ते आपल्याला एक बलशाली, आत्मनिर्भर आणि समृद्ध भारत घडवण्यासाठी प्रेरणा देत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खास मराठी पोस्ट केली असून व्हिडीओ शेअर केला आहे.
नरेंद्र मोदी यांनी भावना व्यक्त करताना म्हटले की, “छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मी त्यांना अभिवादन करतो. त्यांच्या पराक्रमाने आणि दूरदर्शी नेतृत्वाने स्वराज्याची पायाभरणी केली, ज्यामुळे अनेक पिढ्यांना धैर्य आणि न्यायाची मूल्ये जपण्याची प्रेरणा मिळाली. ते आपल्याला एक बलशाली, आत्मनिर्भर आणि समृद्ध भारत घडवण्यासाठी प्रेरणा देत आहेत.”
“माझ्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त नाव नाही. हे फक्त राजा, महाराजा, राजपुरूष नाहीत, तर आमच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज हे आराध्य देव आहेत. आमच्यासाठी आराध्य देवापेक्षा मोठे काही असू शकत नाही. छत्रपती शिवाजी महाराजाचं शौर्य, विचारधारा आणि न्याय प्रियतेने अनेक पिढ्यांना प्रेरित केले आहे. त्यांची धाडसी कार्यशैली, सामरिक कौशल्य आणि शांततापूर्ण राजकीय पद्धती आजही आपल्यासाठी प्रेरणेचा स्त्रोत आहेत,” अशा भावना नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केल्या आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मी त्यांना अभिवादन करतो.
त्यांच्या पराक्रमाने आणि दूरदर्शी नेतृत्वाने स्वराज्याची पायाभरणी केली, ज्यामुळे अनेक पिढ्यांना धैर्य आणि न्यायाची मूल्ये जपण्याची प्रेरणा मिळाली. ते आपल्याला एक बलशाली, आत्मनिर्भर आणि समृद्ध भारत घडवण्यासाठी… pic.twitter.com/zu0vLviiPf
— Narendra Modi (@narendramodi) February 19, 2025
हे ही वाचा :
सिसोदियांनी शासकीय वस्तू चोरल्या
अखिलेश यादव यांचा दुटप्पीपणा उघड; महाकुंभसाठी चुलत बंधूना व्हीआयपी सुविधा
युट्यूबर रणवीर अलाहाबादियाच्या मनात घाण, न्यायालयाने कान उपटले!
कुत्र्यावर खुर्ची उगारणे तरुणाला महाग पडले, एका व्यक्तीने केलेल्या हल्लात अंगठा गमवावा लागला!
पुढे नरेंद्र मोदी म्हणाले की, “या गोष्टीचा अभिमान आहे की जगातील अनेक देशात आजही छत्रपती शिवाजी महाराजांच्या धोरणांची चर्चा होते आणि त्यावर संशोधन होत आहे. इतक्या वर्षांनंतरही त्यांनी स्थापित केलेली मूल्ये आपल्याला पुढे जाण्यासाठी वाट दाखवत आहे. त्याच मूल्यांच्या आधारांवर आपल्याला अमृत काळाची २५ वर्षांची यात्रा पूर्ण करायची आहे. हा प्रवास असेल, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वप्नातील भारत बनवण्याचा. ही वाटचाल असेल, स्वराज्य, सुशासन आणि आत्मनिर्भरतेची. मी छत्रपती शिवाजी महारजांच्या चरणी कोटी कोटी नमन करतो,” अशा शब्दात नरेंद्र मोदींनी आपल्या भावना व्यक्त करत छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले आहे.