भुंकणाऱ्या भटक्या श्वानावर खुर्ची उगारने २६ वर्षीय तरुणाला चांगलेच महागात पडले आहे, या तरुणावर झालेल्या हल्ल्यात त्याला आपल्या हाताचा अंगठा गमवावा लागला आहे. ही घटना पश्चिम उपनगरातील जुहू येथे घडली आहे. या तरुणावर हल्ला करणारा २५ वर्षीय तरुणावर जुहू पोलिसांनी हत्येचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार अर्जुन कैलास गिरी (२६) रविवारी त्याचा मित्र रामसिंग राजपूत
सोबत जुहू चौपाटीवर फिरायला गेला होता. बिर्ला लेनवरून घरी परतत असताना, जवळच्या फूड स्टॉलवरून अचानक एका कुत्र्याने गिरीवर हल्ला केला आणि आक्रमकपणे भुंकला, त्यामुळे घाबरून गिरीने जवळची खुर्ची उचलली आणि कुत्र्याला हाकलून लावण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान कुत्र्यावर खुर्ची उगारल्यामुळे तेथे उभ्या असलेल्या व्यक्तीला असलेल्या राग आला आणि त्याने गिरीला शिवीगाळ केली, शाब्दिक वाद हाणामारीत होऊन संतप्त झालेल्या व्यक्तीने फूड स्टॉलवरिल चाकू घेऊन गिरीवर चाकूने हल्ला केला, या हल्लात गिरीच्या डावा हाताच्या अंगठा तुकडा पडला.
हल्ल्यानंतर गिरीला तातडीने उपचारासाठी कूपर रुग्णालयात नेण्यात आले, त्याच्या जबाबावरून, जुहू पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम १०९, ३५२ आणि शस्त्रास्त्र कायद्याच्या कलम ४ आणि २५ अंतर्गत गुन्हा दाखल केला. पोलिसांचे एक पथक तातडीने तैनात करण्यात आले आणि ओंकार मनोहर मुखिया उर्फ ओंकार शर्मा (२५) याला याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.
हे ही वाचा :
गाझियाबादमधील मदरशावर बुलडोझर, २ लाखांचा दंडही ठोठावला!
मुख्यमंत्र्यांसमोर पदर पसरून देशमुख कुटुंबियांसाठी न्याय मागणार
३० वर्षांपासून बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी जोडप्यासह त्यांच्या मुलाला अटक