अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपाखाली सात मुस्लिम तरुणांना ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी सांगितले की, पाच अल्पवयीन मुलींच्या कुटुंबियांनी बेवार जिल्ह्यातील विजय नगर पोलिस ठाण्यात १० मुस्लिम तरुणांविरुद्ध लैंगिक शोषण, बलात्कार, पाठलाग आणि पोक्सो कायद्याच्या विविध कलमांखाली तीन एफआयआर दाखल केले आहेत. या प्रकरणी कारवाई करत सात जणांना अटक ताब्यात घेण्यात आले असून पुढील कारवाई सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिस उपअधीक्षक सज्जन सिंह यांनी सांगितले की, लैंगिक अत्याचार प्रकरणी ५ अल्पवयीन मुलींनी तक्रार दाखल केली होती. मोबाईल फोन देवून लैंगिक अत्याचार केल्याचे पिडीत अल्पवयीन मुलींनी तक्रारीत सांगितले. या प्रकरणात तीन एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. मुलींचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. या प्रकरणात न्यायालयीन चौकशी प्रलंबित आहे.
हे ही वाचा :
कुत्र्यावर खुर्ची उगारणे तरुणाला महाग पडले, एका व्यक्तीने केलेल्या हल्लात अंगठा गमवावा लागला!
गाझियाबादमधील मदरशावर बुलडोझर, २ लाखांचा दंडही ठोठावला!
मुख्यमंत्र्यांसमोर पदर पसरून देशमुख कुटुंबियांसाठी न्याय मागणार
दरोड्याचा बनाव रचणाऱ्या ‘आप’ नेत्यानेचं पत्नीच्या हत्येसाठी पाठवले होते हल्लेखोर
या प्रकरणात ७ जणांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांची चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी सांगितले की, आरोपींनी सोशल मीडियाद्वारे अल्पवयीन मुलींशी संपर्क साधला होता आणि त्यांचाशी संपर्क साधण्यासाठी चीन कंपनी निर्मित मोबाईल फोन दिले होते. मुलींचा आरोप आहे की त्यांना ब्लॅकमेल केले जात होते आणि धर्माबद्दल बोलण्यास भाग पाडले जात होते. अधिकाऱ्याने सांगितले की, पोलिस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.