26 C
Mumbai
Tuesday, March 18, 2025
घरविशेषछत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीचे एक पर्व म्हणजेचं मराठ्यांचं आरमार!

छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीचे एक पर्व म्हणजेचं मराठ्यांचं आरमार!

हिंदुस्तानाचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती

Google News Follow

Related

महाराष्ट्राचेचं नव्हे तर या हिंदुस्थानचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, उत्कृष्ट योद्धा, आदर्श शासनकर्ता, सहिष्णू राजा अशी अनेक विशेषणं सांगून ओळख करून दिली तरी छत्रपती शिवरायांचे व्यक्तिमत्त्व या शब्दांमध्ये बांधणं हे केवळ अशक्य. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या कर्तबगारीने जगाच्या आणि विशेषतः महाराष्ट्राच्या इतिहासावर आपला अमीट असा ठसा उमटवला आहे.

केवळ लढाईत छत्रपती शिवाजी महाराज कुशल नव्हते तर राजकीय डावपेच आखण्यात आणि दूरदृष्टी ठेवून स्वराज्य हिताचे निर्णय घेण्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे कसब होते. त्यांच्या दूरदृष्टीचे एक पर्व म्हणजेचं मराठ्यांचं आरमार. छत्रपती शिवाजी महाराजांनी युरोपीय शक्तींची ताकद ओळखून स्वदेशी आरमाराचा पाया रचला. छत्रपती शिवरायांनी फत्ते केलेल्या अनेक मोहिमा आज त्यांची ओळख बनल्या असल्या तरी शिवरायांची आणखी एक ओळख आहे ती म्हणजे भारतीय नौदलाचे जनक.

स्वराज्य आणि मराठा साम्राज्याचा विस्तार होत असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी सागरी सीमांचे रक्षण करण्यासाठी शक्तिशाली आरमार उभारले. ज्याचे आरमार त्याचा समुद्र, हे सूत्र छत्रपती शिवाजी महाराजांना चांगल्या प्रकारे माहीत होतं. त्या काळी मराठा साम्राज्यामधे कल्याण आणि त्याच्या आसपासचा संपूर्ण भाग होता. कोकणापासून ते गोव्यापर्यंतच्या समुद्र किनाऱ्याचे रक्षण करण्यासाठी मराठा आरमार सक्षम झाले होते. मराठा आरमाराची स्थापना झाल्याने कोकण किनारपट्टीचे पोर्तुगीज, अरबी, डच समुद्री लुटारूंपासून संरक्षण होऊ लागले. यासोबतचं लढाऊ जहाजांची निर्मिती करण्यावरही भर देण्यात आला. आरमारासोबतचं समुद्री किल्ल्यांच्या डागडुजी आणि निर्मितीकडेही महाराजांनी विशेष लक्ष दिले होते. सिंधुदुर्ग, पद्मदुर्ग, विजयदुर्ग, खांदेरी या किल्ल्यांच्या निर्मितीवरून हे दिसून येते. स्थानिक मच्छिमारांना छत्रपती शिवाजी महाराजांनी नौदलात भरती करून घेतले. त्यांना सढळहस्ते निधी दिला.

हे ही वाचा : 

सिसोदियांनी शासकीय वस्तू चोरल्या

अखिलेश यादव यांचा दुटप्पीपणा उघड; महाकुंभसाठी चुलत बंधूना व्हीआयपी सुविधा

युट्यूबर रणवीर अलाहाबादियाच्या मनात घाण, न्यायालयाने कान उपटले!

कुत्र्यावर खुर्ची उगारणे तरुणाला महाग पडले, एका व्यक्तीने केलेल्या हल्लात अंगठा गमवावा लागला!

कान्होजी आंग्रे हे मराठा आरमाराचे पाहिले सेना प्रमुख होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीमुळे समुद्री सीमांचे सरंक्षण होऊन बळकटी आली. पुढे मराठा साम्राज्याचा मोठा विस्तार झाला. मराठा सैन्याचा एक भाग म्हणून मजबूत आरमाराकडेही पाहिले जाऊ लागले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नौदलाच उल्लेख आजही गौरवाने केला जातो. आजही छत्रपती शिवाजी महाराजांना नौदलाचे जनक म्हणूनचं पाहिले जाते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
236,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा