27 C
Mumbai
Tuesday, March 18, 2025
घरराजकारणराहुल गांधींनी तोडले अकलेचे तारे; छत्रपती शिवरायांना जयंतीच्या दिवशी वाहिली श्रद्धांजली

राहुल गांधींनी तोडले अकलेचे तारे; छत्रपती शिवरायांना जयंतीच्या दिवशी वाहिली श्रद्धांजली

भाजपाने साधला निशाणा

Google News Follow

Related

महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी होत असताना सोशल मीडियावर देखील छत्रपती शिवरायांना अभिवादन केले जात आहे. अशातच लोकसभेचे विरोधी पक्ष नेते, खासदार राहुल गांधी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल पोस्ट करताना मोठी चूक केली आहे. यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटले आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सोशल मीडियावर पोस्ट करताना मोठी चूक केली आहे. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंतीच्या दिवशी श्रद्धांजली वाहिली आहे. यामुळे राहुल गांधी हे नव्या वादात सापडले आहेत. त्यांनी केलेल्या पोस्टनंतर त्यांच्यावर चोहोबाजूंनी टीकेची झोड उठवली जात आहे.

राहुल गांधी यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, “छत्रपति शिवाजी महाराज यांना जयंतीनिमित्त नमन आणि त्यांना मी विनम्र श्रद्धांजली अर्पण करत आहे. त्यांच्या धाडस आणि शौर्यामुळे आपल्याला निडर आणि पूर्ण समर्पणपणे आवाज उठवण्याची प्रेरणा मिळाली. त्यांचे जीवन हे आपल्यासाठी नेहमी प्रेरणास्त्रोत असणार आहे.” मात्र, या पोस्टमध्ये राहुल गांधी यांनी आदरांजली ऐवजी श्रद्धांजली शब्द वापरल्याने ते चांगलेच कोंडीत सापडले आहेत.

राहुल गांधी यांच्या या पोस्टनंतर भाजपाने राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. भाजपा महाराष्ट्रने आपल्या अधिकृत ‘एक्स’ अकाऊन्टवरून म्हटले आहे की, “जाणून-बुजून शिवजन्मोत्सवाच्या दिवशी राहुल गांधींने छत्रपती शिवरायांना श्रद्धांजली देण्याचा विकृतपणा दाखवला आहे. महापुरुषांचा फक्त राजकीय फायद्यासाठी वापर करणे ही काँग्रेसची घाणेरडी मानसिकता नेहमी जनतेसमोर उघड होते. या शिवद्रोही काँग्रेसला तमाम हिंदू बांधव कधीही माफ करणार नाहीत.”

हे ही वाचा : 

पाच राज्यांना १५५४.९९ कोटींचा राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधी मंजूर

भारताच्या पंतप्रधानांबद्दल खूप आदर, पण अमेरिका भारताला मतदानासाठी पैसे का देतोय?

छत्रपती शिवरायांचे किल्ले कोणत्याही मंदिरापेक्षा मोठे!

काँग्रेसशासित हिमाचलमध्ये मशिदीसमोर उभारलेल्या महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याला विरोध

भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनीही राहुल गांधी यांच्या या पोस्टचा निषेध करत त्यांच्यावर टीका केली आहे. अतुल भातखळकर यांनी म्हटले आहे की, “ज्यांच्या खानदानाचा इतिहास मुघलांच्या आरत्या ओवाळण्याचा आहे. ज्यांच्या पणजोबांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत अपमानास्पद लिखाण केले होते, त्या राहुल गांधींना महाराजांबाबत श्रद्धा असण्याचे काही कारण नाही. त्यामुळेचं जयंती दिवशी त्यांनी श्रद्धांजली अर्पण करून शिवरायांचा अपमान केलेला आहे. हा निव्वळ बावळटपणा नाही, नसानसात भिनलेल्या तुष्टीकरणाच्या राजकारणातून हे घडलेले आहे. याचा तीव्र निषेध.”

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
236,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा