हिमाचल प्रदेशातील हमीरपूर येथील सुजानपूरमध्ये महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याच्या स्थापनेवरून वाद निर्माण झाला आहे. मशिदीसमोर महाराणा प्रताप यांचा पुतळा उभा करू नये यासाठी मुस्लीम समुदायाकडून आवाज उठवला जात आहे. यामुळे भविष्यात दोन गटांमध्ये वाद होतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. मशिदीसमोरील महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याविरुद्धच्या निषेधानंतर, हिंदू संघटनांनीही मुस्लीम संघटनांची मागणी फेटाळून लावली आहे.
हिमाचल प्रदेशातील सुजानपूरमध्ये, महानगरपालिका संबंधित परिसराचे सौंदर्यीकरण करत आहे. याअंतर्गत सुजानपूर येथील एका मशिदीसमोर महाराणा प्रताप यांचा पुतळा बसवण्यात आला. यानंतर आता मुस्लिम समुदाय मशिदीसमोर हा पुतळा बसवणे चुकीचे असल्याचे म्हणत निषेध करत आहे. या प्रकरणी, मुस्लिम सुधार सभेच्या सुजानपूरच्या शिष्टमंडळाने हमीरपूरच्या डीसी यांची भेट घेतली. तसेच मशिदीसमोरील पुतळा हटवण्याची मागणी शिष्टमंडळाने केली आहे. मुस्लिम रिफॉर्म ऑर्गनायझेशनच्या लोकांचे म्हणणे आहे की, मशिदीसमोरील मूर्तीमुळे भविष्यात मतभेद होऊ शकतात.
मुस्लीम समाजाच्या या विरोधामुळे सोशल मीडियावर निरनिराळ्या प्रतिक्रिया उमटत असून लोकांनीही यावर भाष्य केले आहे. भारतातील महान योद्ध्यांपैकी एक असलेल्या महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याची स्थापना वातावरण बिघडवण्याच्या नावाखाली विरोधाला सामोरे जात आहे हे दुर्दैवी आहे. आपल्या लोकांसाठी आणि आपल्या भूमीसाठी लढणाऱ्या नेत्याला वाद नाही तर आदर मिळायला हवा, अशा भावना लोकांनी व्यक्त केल्या आहेत. तर, हिमाचलमध्ये काँग्रेसचे सरकार असल्यानेचं अशा मुद्द्यांना हवा मिळत असल्याचे काही सोशल मीडिया वापरकर्त्यांनी म्हटले आहे.
Himachal, Hamirpur: Now they have problem in installing Maharana Pratap's statue in front of a mosque. The proposal came under plan to beautify the area.
Reason: They are claiming it will disturb the atmosphere. pic.twitter.com/9wc1xTvojk
— Megh Updates 🚨™ (@MeghUpdates) February 19, 2025
मुस्लिम रिफॉर्म ऑर्गनायझेशनचे सुजानपूरचे सरचिटणीस रफिक म्हणाले की, महानगरपालिकेकडून या परिसराचे सुशोभीकरण केले जात आहे. ही चांगली गोष्ट आहे, हा परिसर सुंदर बनवला पाहिजे. पण मशिदीसमोर मूर्ती बसवल्याने भविष्यात मतभेद निर्माण होऊ शकतात. महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याला आमचा कोणताही आक्षेप नाही, तो पुतळा मशिदीसमोरून काढून दुसरीकडे कुठेतरी बसवला पाहिजे. कारण अनेक भागातील लोक मशिदीत नमाज अदा करण्यासाठी येतात. अशा परिस्थितीत पुतळ्यामुळे दोन्ही समुदायांमध्ये द्वेष पसरू शकतो. मुस्लिम रिफॉर्म ऑर्गनायझेशन सुजानपूरच्या वतीने हमीरपूर डीसींना मशिदीसमोरील महाराणा प्रताप यांचा पुतळा काढून तो दुसरीकडे स्थापित करावा यासाठी निवेदन देण्यात आले आहे.
हे ही वाचा :
छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त राजा, महाराजा, राजपुरूष नाहीत, तर आराध्य देव आहेत!
छत्रपती संभाजी महाराजांवरील आक्षेपार्ह मजकुराबद्दल विकिपीडियाला पोलिसांची नोटीस
अखिलेश यादव यांचा दुटप्पीपणा उघड; महाकुंभसाठी चुलत बंधूना व्हीआयपी सुविधा
युट्यूबर रणवीर अलाहाबादियाच्या मनात घाण, न्यायालयाने कान उपटले!
विश्व हिंदू परिषदेचे पदाधिकारी पंकज भारतीय म्हणाले की, महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याविरुद्धचा निषेध अत्यंत दुर्दैवी आहे. महाराणा प्रताप यांचे संपूर्ण आयुष्य देश आणि समाजासाठी समर्पित होते. महाराणा प्रताप यांचा पुतळा बसवण्याचा निर्णय महानगरपालिकेने घेतल्याचेही त्यांनी सांगितले. यावरून हे स्पष्ट होते की हे लोक प्रशासनाचा किंवा कायद्याचा आदर करत नाहीत.